https://petapixel.com/2017/06/26/photographing-hang-son-doong-worlds-largest-cave/
More to Explore,  शोध अज्ञाताचा.....

जगातील सगळ्यात मोठी गुहा : . हांग सन डूंग (World’s Largest Cave : Hang Son Doong)

जगातील सगळ्यात मोठी गुहा : . हांग सन डूंग (World’s Largest Cave : Hang Son Doong)

निसर्गाचे आविष्कार हे नेहमीच आपल्यासाठी एक आश्चर्य राहिले आहेत. असाच एक अद्भुत आविष्कार म्हणजे व्हिएतनाममधील हांग सन डूंग गुहा. ही गुहा जगातील सगळ्यात मोठी गुहा तर आहेच, पण गुहेतील वातावरणही बाहेरील वातावरणापेक्षा पूर्णतः वेगळे आहे. अगदी तिचे स्वतःचे जंगल, विविध प्रकारची झाडं-झुडुपं, रों-रों आवाज। करत वाहणारी नदी, तलाव सगळंच हांग सन डूंगचं. एक स्वतंत्र अस्तित्व सिद्ध करतं. गुहेत प्रवेश करताक्षणी वाटावं की आपण एका नव्या, वेगळ्या दुनियेत पाऊल ठेवलंय!

व्हिएतनामच्या जंगलात हांग सन डूंग स्थित आहे. १९९१ साली हो खान नामक स्थानिक व्यक्तीने या गुहेचा शोध लावला, पण गुहेतील दाट काळोख व आतून वाहणाऱ्या नदीची भयंकर गर्जना यांमुळे कोणाचीही आत जाण्याची हिंमत झाली नाही. त्यानंतर तब्बल १८ वर्षांनी म्हणजे २००९ साली ब्रिटिश केव्ह रिसर्च असोसिएशन या संस्थेने शोधमोहीम हाती घेतली व त्याअंतर्गत एक अभियान राबवले. तेव्हा जगाला हांग सन डूंग व तिच्याआतील अद्भुत दुनियेची ओळख झाली. तेव्हा १०ते १४ एप्रिल २००९ दरम्यान राबवलेली ही शोधमोहीम मध्ये असलेल्या एका मोठ्या भिंतीमुळे सुरू ठेवता आली नाही. नंतर २०१० साली साहसी ट्रेकर्सच्या एका चमूने ही २०० मीटर उंच भिंत चढून पार केली तेव्हा
गुहेत जाण्याचा मार्ग तर मोकळा झालाच पण त्यांना गुहेतील आणखी काही विस्मयकारक गोष्टी समजल्या. ही गुहा इतकी विशाल आहे की सहज विमानं पार्क करता येतील. ती मलेशियाच्या डीअर केव्ह पेक्षाही दुप्पट मोठी आहे. हांग सन डूंगच्या मुख्य प्रवेशद्वाराची लांबी ५ किलोमीटर, उंची ६६० फूट व रुंदी ४९० फूट आहे, तर संपूर्ण ट्रेक ९ किलोमीटरचा आहे. गुहेचा एक भाग काहीसा तुटलेला असल्यामुळे तिथून सूर्यप्रकाश आत येतो. त्यामुळेच तिथे विविध वनस्पती व वृक्षांची वाढ होऊन एक लहान जंगल तयार झाले आहे.

ही गुहा एक साहसी पर्यटनस्थळ म्हणून नावारूपाला येत आहे, पण पर्यटकांची सुरक्षितता व येथील पर्यावरणाचे संरक्षण करण्याच्या दृष्टीने सगळयांनाच प्रवेश दिला जात नाही. २०१३ साली फक्त ६ टूरिस्टना येथे जाण्याची परवानगी मिळाली, तर त्याच वर्षी २०१४ साठी २२० पर्यटकांनी बुकींग फुल केलं. ही मर्यादा २०१७ मध्ये ८००, तर २०१८ मध्ये ९०० पर्यटकंपर्यंत पोहोचली. आता दरवर्षी फेब्रुवारी ते ऑगस्ट दरम्यान मोजक्याच पर्यटकांना हांग सन डूंग च्या साहसी सफरीवर जायचे असेल तर आधी बुकिंग करावे लागेल. त्यासाठी इथे क्लिक करा

हांग सन डूंगची काही वैशिष्ट्ये :
१. ही गुहा २ ते ५ दशलक्ष वर्षांपूर्वीची असावी , असे मानले जाते.
२. या गुहेत त्याच काळातील काही जीवाश्मही सापडले आहेत.
३. इथे जगातील सगळ्यात उंच चुनखडकाचे उर्ध्वमुखी लवणस्तंभ आहेत, जे अगदी ७० मीटर उंच आहेत.
४. व्हिएतनामच्या ग्रेट वॉलमागे या गुहेतील बेसबॉलच्या आकाराचे विस्मयकारक मोती सापडले आहेत, जे खूप दुर्मीळ आहेत.

हांग सन डूंग
सन डूंग गुहेतील बेस कॅम्पची जागा

Written by Pooja Jadhav & Published by T.W.D.
Also Follow us on below for regular stories and blogs


नमस्कार मंडळी, मी पूजा.... पूजा नरेश जाधव. आपल्या ट्रॅव्हल विथ ड्रीम्स या ब्लॉगच्या माध्यमातून नवनवीन पर्यटनस्थळांची माहिती तुमच्यासमोर आणतेय. गेल्याच वर्षी तोलानी वाणिज्य महाविद्यालयातून B. Com चं शिक्षण पूर्ण केलं. सध्या स्पर्धा परीक्षांची तयारी करतेय. त्यातून वेळ मिळाला की सरळ मोर्चा वळतो तो आपलं सगळ्यात आवडतं काम करायला ! हेच आपल्या ब्लॉगसाठी नवीन पोस्ट बनवण्याकडे.... यासोबत मला नवनवीन पदार्थ बनवायला आणि खायलाही खूप आवडतात. माझा दुसरा आवडता छंद म्हणजे झाडं लावणे आणि त्यांना न्याहाळत बसणे. अधूनमधून पुस्तकंही वाचते. त्यामध्ये परीकथा, साहसकथा आणि प्रवासवर्णनं वाचण्याकडे माझा जास्त कल असतो. या सगळ्यासोबत कॉलेजमध्ये असताना ज्यूडोचं प्रशिक्षणही घेतलं. नंतर पदवीच्या शेवटच्या वर्षाला असताना महाराष्ट्र टाइम्ससोबत "कॉलेज क्लब रिपोर्टर" म्हणूनही कामाचा अनुभव घेतला. या सगळ्या उद्योगांव्यतिरिक्त मला मनसोक्त भटकंती करायला आणि त्या त्या ठिकाणचे पारंपारिक पदार्थ चाखायलाही खूप आवडतं. तिथली संस्कृती अनुभवणं, लोकांच्या लहानसहान गोष्टींचं निरीक्षण करणं यात वेगळीच मजा येते. तशी स्वप्नं बरीच आहेत, पण त्यातलं एक म्हणजे आपला हा ब्लॉग यशस्वी करायचा. तुम्ही सगळे या प्रवासात आमच्यासोबत आहात, त्यामुळे काळजीचं काही कारणच नाही. ...... खूप बोलले ना. आता थोडं थांबते. तसे आपण भेटत राहूच नवीन पोस्टसोबत. तुम्हांला पोस्ट आवडली का हे जरूर कळवा हं. वाट बघतेय तुमच्या प्रतिक्रियेची.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Enjoy this blog? Please spread the word :)

RSS
EMAIL
Facebook
Facebook
Google+
Google+
http://travelwithdreams.com/worlds-largest-cave-hang-son-doong
Instagram