• BLOG,  India,  More to Explore

    त्रियुगीनारायण : जिथे शिवपार्वती विवाहबंधनात अडकले!

    असं म्हणतात, ‘लग्नगाठ स्वर्गात बांधली जाते, कारण ती पवित्र असते’. म्हणूनच तर विवाहसोहळ्याला खूप महत्त्व आहे, कारण आपण भावनिकदृष्टया त्याच्याशी जोडलेले असतो. त्यामुळे विवाह कुठे करायचा याचाही अगदी कल्पकतेने विचार केला जातो. त्यातूनच उदयाला आलेली कल्पना – डेस्टिनेशन वेडिंग ! अगदी राजसी थाटातील राजमहालांपासून दऱ्याखोऱ्यांतील पर्वतांवर लग्न केली जातात. असंच लग्नासाठी एक हटके डेस्टिनेशन म्हणजे उत्तराखंडमधील त्रियुगीनारायण मंदिर ! ते मंदिर जिथे भगवान शंकर व माता पार्वती यांचा विवाहसोहळा पार पडला.  हा विवाहसोहळा आपल्याला थेट शिवपार्वतीच्या काळात घेऊन जातो. माता पार्वती ही शिवभक्त होती. तिने भगवान शंकराला मिळवण्यासाठी ‘गौरीकुंड’ येथे अखंड तपस्या केली. भगवान शंकर प्रसन्न झाले. त्यांनी गुप्तकाशीमध्ये माता पार्वतीला लग्नाची मागणी घातली. त्यानंतर त्रियुगीनारायण येथे त्यांचा विवाहसोहळा संपन्न झाला. पुराणानुसार त्रियुगीनारायण ही…

Enjoy this blog? Please spread the word :)

RSS
EMAIL
Facebook
Facebook
Google+
Google+
http://travelwithdreams.com/tag/uttarakhand-tourism
Instagram