• BLOG,  Social Corner

  मदत शहीद झाल्यानंतरच का ?

  "भारतमातेच्या रक्षणा,ते स्वतःसाठी जगणं विसरले, कुटुंबावरही पाणी सोडले ! सीमेवर गोठवणाऱ्या थंडीत,रात्ररात्र जागून पहारे दिले !आम्ही गरम जेवणाचे चोचले केले, त्यांनी मात्र मिळेल ते खाल्ले !आम्ही जल्लोषात सण साजरे केले,ते मात्र आमच्या आनंदानेच खूष झाले ! आम्ही कुटुंबासोबत एकत्र वेळ घालवला ,त्यांनी फोटो पाहूनच समाधानाचा ढेकर दिला ! ते कर्तव्य पार पाडताना शहीद झाले, बातमी ऐकून आमच्या काळजात धस्स झाले ! यावेळी त्यांच्या चेहऱ्यावर स्मितहास्य होते,पण आमचे डोळे मात्र पाणावलेले होते !जीवाची बाजी लावताना ते खूष होते, कारण ते भारतमातेचे वीरपुत्र होते.... वीरपुत्र होते !  पुलवामा आतंकी हल्ल्याची बातमी ऐकली अन् प्रेमाच्या गुलाबी रंगात सजलेला देश क्षणार्धात दुःखाच्या सागरात बुडाला. समग्र देशवासियांच्या डोळ्यांत अश्रू होते. हल्लेखोर ‘आतंकीस्तान’वर टीकांचा पाऊस पडला. देशभरातून शहीदांच्या कुटुंबियांना आर्थिक मदत जाहीर झाली. त्यांच्यासाठी जातपात,…

 • BLOG,  Social Corner

  बटाटा,अंड की कॉफी बिन्स..?

  प्रत्येकाच्या आयुष्यात चढउतार हे येतच असतात. आपण त्या घटनेकडे कसे पाहतो यावर पुढच्या गोष्टी ठरतात. अनेकदा संकटं आली की आपण हतबल होतो आणि सरळ देवावर सगळं लादून मोकळे होतो. त्यातूनही काही नाही झालं की नशिबाला दोष देत आयुष्यभर रडत बसतो. अशीच एक रडुबाई होती नयना. मितभाषी, शातं पण लहानसहान गोष्टींचा अतिविचार करणारी. एकेदिवशी कामावरून घरी आली तीच मुसमुसत आईच्या कुशीत शिरली. आईने विचारलं, “नयना,काय झालं ? आल्याआल्याच रडायला लागलीस.” नयना वैतागलेल्या स्वरात आईला म्हणाली, “मी कुणाचं काय वाईट केलंय की माझ्यामागे संकटांचा ससेमिरा लागलायं. एक संपलं की दुसरं समोर असतंच. आई मी थकलेय आता या आयुष्यालाच कंटाळलेय. नको वाटतं आता सगळं”. आईने तिला घट्ट मिठी मारली आणि म्हणाली, “नयना,आज काय…

 • BLOG,  India,  More to Explore

  त्रियुगीनारायण : जिथे शिवपार्वती विवाहबंधनात अडकले!

  असं म्हणतात, ‘लग्नगाठ स्वर्गात बांधली जाते, कारण ती पवित्र असते’. म्हणूनच तर विवाहसोहळ्याला खूप महत्त्व आहे, कारण आपण भावनिकदृष्टया त्याच्याशी जोडलेले असतो. त्यामुळे विवाह कुठे करायचा याचाही अगदी कल्पकतेने विचार केला जातो. त्यातूनच उदयाला आलेली कल्पना – डेस्टिनेशन वेडिंग ! अगदी राजसी थाटातील राजमहालांपासून दऱ्याखोऱ्यांतील पर्वतांवर लग्न केली जातात. असंच लग्नासाठी एक हटके डेस्टिनेशन म्हणजे उत्तराखंडमधील त्रियुगीनारायण मंदिर ! ते मंदिर जिथे भगवान शंकर व माता पार्वती यांचा विवाहसोहळा पार पडला.  हा विवाहसोहळा आपल्याला थेट शिवपार्वतीच्या काळात घेऊन जातो. माता पार्वती ही शिवभक्त होती. तिने भगवान शंकराला मिळवण्यासाठी ‘गौरीकुंड’ येथे अखंड तपस्या केली. भगवान शंकर प्रसन्न झाले. त्यांनी गुप्तकाशीमध्ये माता पार्वतीला लग्नाची मागणी घातली. त्यानंतर त्रियुगीनारायण येथे त्यांचा विवाहसोहळा संपन्न झाला. पुराणानुसार त्रियुगीनारायण ही…

 • India,  More to Explore

  10 Most Beautiful Waterfall of India

  10 Unexplored waterfalls of Northeast India 10 Most Beautifull waterfalls of Northeast India “Water is the most perfect traveller because when it travels it becomes the path itself!” Mehmet Murat ildan Writer Waterfalls have impressive power and beauty of nature. Shimmering and falling, breaking into a thousand shards of spray. Crashing water scares and attracts soul . When if waterfall is from north-east india than there is an heaven .If you really want explore nature than you visit these waterfalls of north-east India . North-east india which consist of 07 sister states which is still unexplored by most of the Indians . North-east india has its own collection culture and beauties…

 • Biggest perennial dabhosa waterfall in Palghar Jawhar
  India,  More to Explore

  १०. दाभोसा धबधबा

  जग फिरण्याचा ध्यास मनी, खुणावती दशदिशा दाही….. विश्वभ्रमंतीची जिज्ञासा भारी,  मिळे अनुभवांची शिदोरी न्यारी !       मग, आहात का सगळे या स्वप्नमय विश्वादौऱ्यासाठी तयार ? वाचकमित्रहो फिरणं ही एक अशीगोष्ट आहे जी आपल्याला दररोजच्या धकाधकीच्या जीवनातून ब्रेक देते आणि स्वतःसाठी जगायलाशिकवते. त्यामुळे आपल्यापैकी अनेकजण सुट्टी मिळाली की गावी पळतात. बच्चेकंपनी थीमपार्क, रिसॉर्ट्स तर कॉलेजिअन्स ट्रेकिंगच्या योजना आखतात. बरेचजण सलग येणाऱ्या सुट्ट्यांचेसमायोजन करून करून परदेशवाऱ्याही करतात.       खरं तर परदेशवारीची सुप्त इच्छा प्रत्येकजण मनी बाळगून असतो. पण कधी सुट्टी मिळालीनाही, तर कधी आर्थिक गणित जमलं नाही म्हणून ती स्वप्नातच राहून जाते. अनेकदा तिथे जाऊनही नीट माहिती नव्हती म्हणून काहीतरी मस्त मिस झाल्याची चुटपूट मनाला लागून राहते. त्यामुळेएखाद्या ठिकाणी जाण्याआधी तिथली संपूर्ण माहिती असणं अत्यावश्यक आहे. आता ‘गुगल’ बाबामुळे ही माहिती तर अगदी एका क्लिकवर उपलब्ध आहे पण इंग्रजीमध्ये ! काही मराठीब्लॉग्सवर महाराष्ट्रातील सर्व गड-किल्ल्यांची माहिती मराठीमध्ये उपलब्ध आहे पण देश-विदेशातील आकर्षणं…… त्यांच्याबद्दल का फक्त इंग्रजीमध्येच जाणून घ्यायचं ? म्हटलं  ‘२७फेब्रुवारी’ लाच का मातृभाषेवरच्या प्रेमाला पाझर फोडायचा ? करूया की एखादा छानसा मराठीब्लॉग सुरू, जिथे मराठीमध्ये भारतासह जगातील विविध देशांची, शहरांची माहिती उपलब्ध होईल. मग या चांगल्या कामासाठी वेळ का दवडा ? म्हणून ‘शुभस्य शीघ्रम’ म्हणत आम्ही हा ब्लॉग सुरूकेलाय. या ब्लॉगवर आपल्या वाचकांना एका टिचकीवर ( क्लिक ला मराठीत टिचकी म्हणतात बरंका ! ) विविध शहरांची संपूर्ण माहिती म्हणजे अगदी जाण्याच्या तयारीपासून ते तिथल्या विविधमहत्त्वाच्या आकर्षणांपर्यंत सगळं उपलब्ध होईल.  हे तर झालंच पण संवाद जर दोन्ही बाजूंनी झाला तर त्यात जिवंतपणा येतो. म्हणूनच आम्ही एकप्रयोग करायचा ठरवलंय. आपल्या वाचकांनीही त्यांच्या प्रवासाचे अनुभव इथे मांडायचे. आम्हीतुमच्या नाव व फोटोसहित त्यांना आपल्या ब्लॉगवर प्रसिद्ध करू. तसेच भारतामध्ये पर्यटन क्षेत्रातघडणाऱ्या घडामोडींचे ताजे अपडेट्स तुम्हांला आपल्या ब्लॉगवर पाहता येतील आणि तुमच्या शंकाहीविचारता येतील. आम्ही तुम्हांला योग्य व पूर्ण मार्गदर्शन करण्याचा प्रयत्न करू. त्याचप्रमाणेतुम्हांला आपला ब्लॉग आणखी आकर्षक व उपयुक्त करण्यासाठी नवनवीन कल्पना सुचत असतीलतरबिनधास्त  आम्हांला  travelwithdreams18@gmail.com या मेल आयडीवर कळवा. अशानाविन्यपूर्ण कल्पना आम्ही नक्की आपल्या ब्लॉगसाठी वापरू.       मायबाप वाचकहो तुम्हांला आमची ही कल्पना आवडली असेल तर नक्की आपल्या ब्लॉगलासबस्क्राईब करा व तुमच्या मित्रमैत्रिणी आणि नातलगांनाही याविषयी जरूर सांगा. चला तर मग’हातात हात गुंफुनी सारे’ सज्ज होऊ या विश्वसफरीसाठी ! 

 • More to Explore,  शोध अज्ञाताचा.....

  गुलाबी तलाव : लेक हिलियर (Lake Hillier)

  आजपर्यंत गुलाबी प्रेम, गुलाबी आँखेंं यांबद्दल ऐकलं होतं. आता गुलाबी तलावही यांच्या यादीत समाविष्ट झाला! हा सुद्धा निसर्गानेच निर्माण केलेला एक चमत्कार : लेक हिलियर. ऑस्ट्रेलियातील रिशर्श आर्किपेलागो (Recherche Archipelago) बेटावरील हा गुलाबी तलाव म्हणजे गुलाबी रंगाचा बबलगमच जणू! एका बाजूला अथांग पसरलेला निळाशार समुद्र , मध्ये दाट झाडी आणि दुसऱ्या बाजूला हा गुलाबी तलाव म्हणजेच लेक हिलियर. या तलावाचे वैशिष्ट्य म्हणजे वर्षभर त्याचे पाणी गुलाबी रंगाचेच असते. तुम्ही थोडे पाणी अगदी तुमच्याकडच्या बाटलीत भरून पाहिले तरी त्याचा रंग काही बदलणार नाही. प्रश्न पडला असेल ना , कसं शक्य आहे म्हणून! म्हणतात ना देवाची करणी अन् नारळात पाणी ! तसंच काहीसं या तलावाचं. वैज्ञानिकांच्या म्हणण्याप्रमाणे तो एक क्षारयुक्त तलाव आहे.…

 • India,  More to Explore

  ६. झेनिथ धबधबा ( Zenith Waterfall )

  आपल्या सौंदर्याची मोहिनी टाकत दरवर्षी अधिकाधिक पर्यटकांचा ओढा खेचून आणणारा धबधबा म्हणजे खोपोलोतील ‘झेनिथ धबधबा’. रायगड जिल्ह्यातील प्रसिद्ध धबधबा अशी त्याची ख्याती आहे . जवळजवळ ८० ते ९० फुटांवरून कोसळणारा हा धबधबा मुंबई व पुणे दोन्ही शहरांपासून जवळ आहे. झेनिथ धबधबा मोठा व वक्राकार आहे. इथे ट्रेकिंग, रॅपलिंगसाठी उत्तम संधी असल्यामुळे अनेक साहसप्रेमी पावसाळ्यात त्याचा आनंद लुटण्यासाठी येतात. मुख्य धबधब्यापासून काही अंतरावर आणखी लहान – मोठे धबधबेही आहेत. त्यामुळे एकांताच्या शोधात असणाऱ्यांनी ती वाट धरायला हरकत नाही. तसेच इथे जवळच दत्ताचे मंदिरदेखील आहे. झेनिथ धबधब्याकडे जाणारा रस्ताही तसा चढ-उतारांचा आहे, पण गटाने जाताना मज्जा येईल. तिथे पोहोचण्याआधी तुम्हांला भातशेतातून व पाण्याच्या लहानमोठ्या झऱ्यांतून जावे लागेल. वाटेत दोन झरे लागतात व…

 • More to Explore,  Travel Stories

  My Trek to Lonavala

  Every one has their own story “Every day, I woke up, I tried to find reasons to live. Every day, when I slept, I tried to find reasons to not die. Every moment, I tried to find reasons to hope, dream and love. But I never found them. Until I met you.” As told above ,every one having their own way explaining story .I will start to describe in short and sweet but this place wont be sufficient to describe in a way I experienced it. You may guess the place ? yes that’s right! The place is in lonavala, I met the group at dadar station to leave for…

Enjoy this blog? Please spread the word :)

RSS
EMAIL
Facebook
Facebook
Google+
Google+
http://travelwithdreams.com/tag/travelwithdreams
Instagram