-
तुम्ही कोण आहात …. सामान्य की असामान्य ?
नमस्कार मंडळी ! आज तुमच्या भेटीला आलेय पण कोणताही निसर्गाचा चमत्कार किंवा पर्यटनासंबंधीचा लेख न घेता ! म्हटलं, दररोज आपण पर्यटनाविषयी बोलतो. आज स्वप्नांवर बोलू काही ! आपल्या ब्लॉगच्या नावातही आहेच की स्वप्न (Dream). खरचं, या शब्दातच फँटसी आहे . नाव उच्चारताच वाचणारा प्रत्येकजण ‘ माझं स्वप्न काय?’ हा विचार करू लागला. तशी ही स्वप्न व्यक्ती, प्रसंग व परिस्थितीनुरूप प्रत्येकासाठी वेगवेगळी असतात. बऱ्याचदा स्वप्न पूर्ण झालं म्हणून एखादा आनंदाने हरखून जातो, तर स्वप्न हे स्वप्नच राहिलं म्हणून एखादा नशिबाला दोष देत बसतो. पण या दोन्ही परिस्थितींमधल्या संधीचं गमक जो ओळखतो तोच खरा विजेता ठरतो. असाच एक विजेता म्हणजे कॅरोली टाकाक्स (Karoly Takacs). आज आपण त्याची जीवनकथा पाहूया. बुडापेस्टमधल्या एका सामान्य मध्यमवर्गीय कुटुंबात जन्माला…