-
जगातील सगळ्यात मोठी गुहा : . हांग सन डूंग (World’s Largest Cave : Hang Son Doong)
जगातील सगळ्यात मोठी गुहा : . हांग सन डूंग (World’s Largest Cave : Hang Son Doong) निसर्गाचे आविष्कार हे नेहमीच आपल्यासाठी एक आश्चर्य राहिले आहेत. असाच एक अद्भुत आविष्कार म्हणजे व्हिएतनाममधील हांग सन डूंग गुहा. ही गुहा जगातील सगळ्यात मोठी गुहा तर आहेच, पण गुहेतील वातावरणही बाहेरील वातावरणापेक्षा पूर्णतः वेगळे आहे. अगदी तिचे स्वतःचे जंगल, विविध प्रकारची झाडं-झुडुपं, रों-रों आवाज। करत वाहणारी नदी, तलाव सगळंच हांग सन डूंगचं. एक स्वतंत्र अस्तित्व सिद्ध करतं. गुहेत प्रवेश करताक्षणी वाटावं की आपण एका नव्या, वेगळ्या दुनियेत पाऊल ठेवलंय! व्हिएतनामच्या जंगलात हांग सन डूंग स्थित आहे. १९९१ साली हो खान नामक स्थानिक व्यक्तीने या गुहेचा शोध लावला, पण गुहेतील दाट काळोख व आतून वाहणाऱ्या…