-
शेटफळ : जिथे सर्पराज्य आहे ! (Shetphal)
सापाचं नाव काढलं तरी भल्याभल्यांच्या तोंडचं पाणी पळतं, पण महाराष्ट्रात एक असं गाव आहे जिथे लोक साप पाळतात. खासकरून कोब्रा प्रजातीचे विषारी साप ! 😥😥😥😥 …..वाचून तुमच्याही तोंडचं पाणी पळालं ना ! Shetpal-Indias-Land-of-Snakes शेटफळ हे एकमेव असं गाव आहे जिथे प्रत्येक घरात साप आढळतात. एवढंच नाही तर घरात सापाला राहण्यासाठी विशिष्ट जागा बनवली जाते. इथले लोक सापाची पूजा करतात. तसेच इथे सापांची अनेक मंदिरंही आहेत. काही घरांच्या भिंतींवरदेखील सापाची आकृती काढलेली आहे. ‘शेटफळ’चे गावकरी म्हणतात की इथे कधीच सापाला मारले जात नाही. कदाचित त्यामुळेच आजतागायत इथे कोणालाही साप चावलेला नाही. इथे शाळा, कॉलेजं यांसोबतच सार्वजनिक ठिकाणीही साप बिनधास्त मोकाट फिरताना दिसतात. इथली मुलंदेखील सापांशी अशी खेळतात जशी एखाद्या खेळण्यासोबत ! snake-village-shetphal मग…