-
मदत शहीद झाल्यानंतरच का ?
"भारतमातेच्या रक्षणा,ते स्वतःसाठी जगणं विसरले, कुटुंबावरही पाणी सोडले ! सीमेवर गोठवणाऱ्या थंडीत,रात्ररात्र जागून पहारे दिले !आम्ही गरम जेवणाचे चोचले केले, त्यांनी मात्र मिळेल ते खाल्ले !आम्ही जल्लोषात सण साजरे केले,ते मात्र आमच्या आनंदानेच खूष झाले ! आम्ही कुटुंबासोबत एकत्र वेळ घालवला ,त्यांनी फोटो पाहूनच समाधानाचा ढेकर दिला ! ते कर्तव्य पार पाडताना शहीद झाले, बातमी ऐकून आमच्या काळजात धस्स झाले ! यावेळी त्यांच्या चेहऱ्यावर स्मितहास्य होते,पण आमचे डोळे मात्र पाणावलेले होते !जीवाची बाजी लावताना ते खूष होते, कारण ते भारतमातेचे वीरपुत्र होते.... वीरपुत्र होते ! पुलवामा आतंकी हल्ल्याची बातमी ऐकली अन् प्रेमाच्या गुलाबी रंगात सजलेला देश क्षणार्धात दुःखाच्या सागरात बुडाला. समग्र देशवासियांच्या डोळ्यांत अश्रू होते. हल्लेखोर ‘आतंकीस्तान’वर टीकांचा पाऊस पडला. देशभरातून शहीदांच्या कुटुंबियांना आर्थिक मदत जाहीर झाली. त्यांच्यासाठी जातपात,…
-
विविधरंगी प्रेमाचा बोगदा (Tunnel of Love)
प्रेमाचं प्रतीक काहीही असू शकतं. अगदी गुलाबाच्या फुलापासून डेरीमिल्कच्या चॉकलेटपर्यंत काहीही ! इथे साधन महत्त्वाचं नसतं तर भावना महत्त्वाच्या असतात. त्या जोडीदाराला आपल्याशी घट्ट बांधून ठेवतात आणि नात्याची वीण मजबूत करतात. म्हणूनच तर शहाजहानने बांधलेला ‘ताजमहाल’ प्रेमाचं प्रतीक म्हणून नावारूपाला आला. बेगम मुमताजच्या मृत्यूनंतरही या ‘ताजमहाल’ने त्या दोघांना आठवणींच्या रुपात कायम एकत्र ठेवलं. असंच नावारूपाला आलेलं एक प्रेमाचं अनोखं प्रतीक म्हणजे युक्रेनमधला प्रेमाचा बोगदा (Tunnel of Love) . साधारणतः बोगदा म्हटलं की डोळ्यासमोर येतो तो काळोखातला रस्ता आणि त्यावरून सुसाट जाणाऱ्या गाड्या किंवा ट्रेन. मग असा हा बोगदा प्रेमाचं प्रतीक कसा होऊ शकतो ? खरं तर प्रेमाचा हा बोगदा थोडा वेगळा आहे. त्याच्या अगदी मधोमध रेल्वेची पटरी आहे आणि…
-
शनिशिंगणापूर – दरवाजे नसलेलं गाव ! (Shani shingnapur – Village with no doors)
१. शनिशिंगणापूर – दरवाजे नसलेलं गाव ! ( Shani shingnapur – Village with no doors) नावावरूनच गावात ‘शनी’ देवाची पूजा केली जात असणार हे लक्षात येतं. या गावाच्या नावालाही इतिहास आहे. म्हटलं जातं की एक गुराख्याने अनेक वर्षांपूर्वी जमिनीतून एक काळा दगड वर येताना पाहिला. त्याला आश्चर्य वाटलं. त्याने हातातल्या लाकडी काठीने तो दगड चाचपला आणि पाहतो तर काय ? जिथे त्या काठीचा स्पर्श झाला तिथून रक्ताची धार वाहू लागली. गुराखी घाबरला. अचानक शनिदेव तिथे प्रकट झाले व त्या गुराख्याला म्हणाले , “या जागेवरील हा काळा दगड म्हणजे माझे स्थान आहे. मी सदैव इथे वास्तव्य करेन. या जागेवर कधीही मंदिर बांधू नका, परंतु दर शनिवारी नित्यनियमाने तेलाचा अभिषेक करा.” तेव्हापासून…
-
असाव्या सुंदर चॉकलेटच्या टेकड्या : चॉकलेट हिल्स
‘असावा सुंदर चॉकलेटचा बंगला, चंदेरी सोनेरी चमचमता चांगला’ हे बालगीत लहानपणी आपण सगळ्यांनीच पाठ केलंय . अगदी आपलाही चॉकलेटचा बंगला असावा अशा कल्पनाही केल्या, पण तेव्हा काही या बंगल्यात जाण्याचा योग आला नाही. जर आता कोणी चॉकलेटच्या टेकडीवर जाऊ असं म्हटलं तर …. आणि एकच टेकडी नाही बरं का ! १७७० हून जास्त “फक्त चॉकलेटच्याच टेकड्या !” . मी काही कल्पना किंवा स्वप्न सांगत नाहीये . खरंच आहेत चॉकलेटच्या टेकड्या , पण त्या पाहायच्या असतील तर फिलिपिन्स ला यावं लागेल. तुमचा पुन्हा एकदा गोंधळ उडालेला दिसतोय. चमकत्या ताऱ्यांच्या दर्या, गुलाबी तलाव इथपर्यंत ठीक होतं , पण आता चॉकलेटच्या टेकड्याही मिळाल्या ! कशा ? तर ही सुद्धा निसर्गाचीच एक करामत पण…
-
१०. दाभोसा धबधबा
जग फिरण्याचा ध्यास मनी, खुणावती दशदिशा दाही….. विश्वभ्रमंतीची जिज्ञासा भारी, मिळे अनुभवांची शिदोरी न्यारी ! मग, आहात का सगळे या स्वप्नमय विश्वादौऱ्यासाठी तयार ? वाचकमित्रहो फिरणं ही एक अशीगोष्ट आहे जी आपल्याला दररोजच्या धकाधकीच्या जीवनातून ब्रेक देते आणि स्वतःसाठी जगायलाशिकवते. त्यामुळे आपल्यापैकी अनेकजण सुट्टी मिळाली की गावी पळतात. बच्चेकंपनी थीमपार्क, रिसॉर्ट्स तर कॉलेजिअन्स ट्रेकिंगच्या योजना आखतात. बरेचजण सलग येणाऱ्या सुट्ट्यांचेसमायोजन करून करून परदेशवाऱ्याही करतात. खरं तर परदेशवारीची सुप्त इच्छा प्रत्येकजण मनी बाळगून असतो. पण कधी सुट्टी मिळालीनाही, तर कधी आर्थिक गणित जमलं नाही म्हणून ती स्वप्नातच राहून जाते. अनेकदा तिथे जाऊनही नीट माहिती नव्हती म्हणून काहीतरी मस्त मिस झाल्याची चुटपूट मनाला लागून राहते. त्यामुळेएखाद्या ठिकाणी जाण्याआधी तिथली संपूर्ण माहिती असणं अत्यावश्यक आहे. आता ‘गुगल’ बाबामुळे ही माहिती तर अगदी एका क्लिकवर उपलब्ध आहे पण इंग्रजीमध्ये ! काही मराठीब्लॉग्सवर महाराष्ट्रातील सर्व गड-किल्ल्यांची माहिती मराठीमध्ये उपलब्ध आहे पण देश-विदेशातील आकर्षणं…… त्यांच्याबद्दल का फक्त इंग्रजीमध्येच जाणून घ्यायचं ? म्हटलं ‘२७फेब्रुवारी’ लाच का मातृभाषेवरच्या प्रेमाला पाझर फोडायचा ? करूया की एखादा छानसा मराठीब्लॉग सुरू, जिथे मराठीमध्ये भारतासह जगातील विविध देशांची, शहरांची माहिती उपलब्ध होईल. मग या चांगल्या कामासाठी वेळ का दवडा ? म्हणून ‘शुभस्य शीघ्रम’ म्हणत आम्ही हा ब्लॉग सुरूकेलाय. या ब्लॉगवर आपल्या वाचकांना एका टिचकीवर ( क्लिक ला मराठीत टिचकी म्हणतात बरंका ! ) विविध शहरांची संपूर्ण माहिती म्हणजे अगदी जाण्याच्या तयारीपासून ते तिथल्या विविधमहत्त्वाच्या आकर्षणांपर्यंत सगळं उपलब्ध होईल. हे तर झालंच पण संवाद जर दोन्ही बाजूंनी झाला तर त्यात जिवंतपणा येतो. म्हणूनच आम्ही एकप्रयोग करायचा ठरवलंय. आपल्या वाचकांनीही त्यांच्या प्रवासाचे अनुभव इथे मांडायचे. आम्हीतुमच्या नाव व फोटोसहित त्यांना आपल्या ब्लॉगवर प्रसिद्ध करू. तसेच भारतामध्ये पर्यटन क्षेत्रातघडणाऱ्या घडामोडींचे ताजे अपडेट्स तुम्हांला आपल्या ब्लॉगवर पाहता येतील आणि तुमच्या शंकाहीविचारता येतील. आम्ही तुम्हांला योग्य व पूर्ण मार्गदर्शन करण्याचा प्रयत्न करू. त्याचप्रमाणेतुम्हांला आपला ब्लॉग आणखी आकर्षक व उपयुक्त करण्यासाठी नवनवीन कल्पना सुचत असतीलतरबिनधास्त आम्हांला travelwithdreams18@gmail.com या मेल आयडीवर कळवा. अशानाविन्यपूर्ण कल्पना आम्ही नक्की आपल्या ब्लॉगसाठी वापरू. मायबाप वाचकहो तुम्हांला आमची ही कल्पना आवडली असेल तर नक्की आपल्या ब्लॉगलासबस्क्राईब करा व तुमच्या मित्रमैत्रिणी आणि नातलगांनाही याविषयी जरूर सांगा. चला तर मग’हातात हात गुंफुनी सारे’ सज्ज होऊ या विश्वसफरीसाठी !
-
९. उलटा धबधबा (सडावाघापूर धबधबा)
आतापर्यंत आपण सगळ्यांनीच कड्यावरून धो-धो कोसळणारे झेनिथ धबधबा, चिंचोटी धबधबा यांसारखे ‘सरळ’ धबधबे पाहिलेत आणि त्यांंच्यात मनसोक्त चिंब झालो, पण तुम्ही कधी ‘उलटा धबधबा’ ( Reverse waterfall) पाहिलाय का ? आश्चर्य वाटलं ना ! पण निसर्गाला काहीच अशक्य नाही. त्याचाच अद्भुत चमत्कार म्हणजे हा उलटा धबधबा ( Reverse waterfall). अजूनही विचार करताय ना ‘उलटा धबधबा’ ( Reverse waterfall) नक्की कसा असेल याचा! या धबधब्याचं गुपित तसं साधं-सरळच आहे आणि ते लपलंय साताऱ्यातील पाटण तालुक्यात. कास पठाराच्या रस्त्याकडे जाताना यवतेश्वर डोंगरापुढे काही अंतरावर सडावाघापूर ( Sadawaghapur) हे लहानसं गाव आहे. या परिसरावर निसर्गाने मुक्तहस्ते सौंदर्याची उधळण केली आहे, त्यामुळे त्याला “मिनी महाबळेश्वर” असे देखील म्हणतात. पावसाळ्यात तर इथली निसर्गाची नवलाई पाहण्यासारखी…
-
८. लोणावळा धबधबा (Lonavala Waterfall)
[kc_row use_container=”yes” force=”no” column_align=”middle” video_mute=”no” _id=”940123″][kc_column width=”12/12″ video_mute=”no” _id=”692358″][kc_column_text _id=”974555″] लोणावळा धबधबा (Lonavala Waterfall) लोणावळा – खंडाळ्याला अगदी सामान्य माणसापासून बॉलीवूडकरांपर्यंत सगळ्यांनीच डोक्यावर घेतलं. तिथलं निसर्गसौंदर्यच इतकं अप्रतिम की सहज कोणालाही भुरळ पडावी. पावसाळ्यात तर उंचावरून कोसळणाऱ्या शुभ्र जलप्रपातांमुळे या सौंदर्याला आणखी ‘”चार चाँद” लागतात आणि पर्यटक तिथे आकर्षिले जातात. घाटातून जाताना अनेक धबधबे दिसतात, पण “लोणावळा” धबधब्याची बातच न्यारी ! गजबजलेल्या भुशी धरणापासून थोडं पुढे गेल्यावर उजव्या बाजूला पार्किंगसाठी एक मोठी जागा आहे. तिथे चहा, गरमागरम भजी व मसालेदार भुट्टा विकणारे लहान-लहान स्टॉल्स आहेत. तिथून एक छोटा कडा उतरल्यावर या धबधब्याचं दर्शन होतं, पण तिथे जाण्यासाठी कोणतीही दिशादर्शक पाटी नाही. त्यामुळे या स्थानिक विक्रेत्यांना विचारतच मार्गक्रमणा करावी लागते. १५…
-
हजारो टेकड्यांचा भूप्रदेश : रुवांडा ( Land of Thousand Hills : Rwanda )
हजारो टेकड्यांचा भूप्रदेश : रुवांडा ( Land of Thousand Hills : Rwanda ) रुवांडा (Rwanda)…… नाव ऐकूनच पहिलं आश्चर्य वाटलं ना ! कधीही ऐकिवात न आलेला हा देश म्हणजे निसर्गाने मुक्तहस्ते केलेली सौंदर्याची उधळण असेल, असं नाव वाचून तरी नक्कीच वाटलं नसेल. पण १०००हून अधिक टेकड्या, जिकडेतिकडे हिरवळ, रंगीबेरंगी प्राणीपक्षी यांनी संपन्न असलेला रुवांडा(Rwanda) म्हणजे निसर्गप्रेमींसाठी मेजवानीच आहे. जसजशी आपण माहिती घेत जाऊ, तसे तुम्हीदेखील ‘रुवांडा’च्या प्रेमात पडाल एवढं नक्की ! रुवांडा नेमका आहे तरी कुठे ? (Where Rwanda is located?)आफ्रिकेच्या भूमीत मध्यपूर्वेला वसलेला हा छोटासा देश आहे. “भूप्रदेशांनी वेढलेला” युगांडा, “घनदाट अरण्य व सरोवरांचे माहेरघर” टांझानिया, “दाट लोकसंख्येचा” बुरुंडी व “नैसर्गिक साधनसंपत्तीने युक्त” काँगोचे…
-
७. कोंडाणे गुंफा ( Kondane Caves)
तुम्हांला पावसाची मजा घेत इतिहासात रमायला आवडेल का? प्राचीन काळातील बौद्ध भिक्षुकांच्या जीवनाचा मागोवा घ्यायला व एक रात्र गुंफेत तळ ठोकायला आवडेल का? जर या दोन्ही प्रश्नांची उत्तरं ‘हो’ अशी असतील तर आमच्याकडे आहे तुमच्यासाठी एक मस्त ठिकाण – कर्जतमधील ‘कोंडाणे गुंफा’. इसवीसन पूर्व पहिल्या शतकातील या प्राचीन गुंफा म्हणजे त्या काळातील बौद्ध भिक्षुकांचे निवासस्थान. गौतम बुद्धांची शिकवण देण्यासाठी ते गावोगाव फिरत. त्याकाळी काही आजच्यासारखी वाहतूक नव्हती. त्यामुळे मैलोनमैल जाण्यासाठी पायपीट करावी लागे.मग पावसाळ्यात, हिवाळ्यात चालून थकल्यानंतर आसरा घेण्यासाठी, विश्रांतीसाठी एक निश्चित जागा असावी या हेतूने या गुंफा बांधल्या. एकूण १६ गुंफांचा संग्रह असलेल्या या बुद्धिस्ट गुंफा म्हणजे प्राचीन शिल्पकलेचा उत्कृष्ट नमुना. या गुंफेत विहार, चैत्य व स्तूप कोरले आहेत.…
-
गुलाबी तलाव : लेक हिलियर (Lake Hillier)
आजपर्यंत गुलाबी प्रेम, गुलाबी आँखेंं यांबद्दल ऐकलं होतं. आता गुलाबी तलावही यांच्या यादीत समाविष्ट झाला! हा सुद्धा निसर्गानेच निर्माण केलेला एक चमत्कार : लेक हिलियर. ऑस्ट्रेलियातील रिशर्श आर्किपेलागो (Recherche Archipelago) बेटावरील हा गुलाबी तलाव म्हणजे गुलाबी रंगाचा बबलगमच जणू! एका बाजूला अथांग पसरलेला निळाशार समुद्र , मध्ये दाट झाडी आणि दुसऱ्या बाजूला हा गुलाबी तलाव म्हणजेच लेक हिलियर. या तलावाचे वैशिष्ट्य म्हणजे वर्षभर त्याचे पाणी गुलाबी रंगाचेच असते. तुम्ही थोडे पाणी अगदी तुमच्याकडच्या बाटलीत भरून पाहिले तरी त्याचा रंग काही बदलणार नाही. प्रश्न पडला असेल ना , कसं शक्य आहे म्हणून! म्हणतात ना देवाची करणी अन् नारळात पाणी ! तसंच काहीसं या तलावाचं. वैज्ञानिकांच्या म्हणण्याप्रमाणे तो एक क्षारयुक्त तलाव आहे.…