• More to Explore

    मोराची चिंचोली : एक अविस्मरणीय अनुभव !

    "नाच रे मोरा ,आंब्याच्या वनात  नाच रे मोरा नाच ढगांशी वारा झुंजला रे,काळा काळा कापूस पिंजला रेआता तुझी पाळी ,वीज देते टाळीफुलव पिसारा नाच,नाच रे मोरा......" बघा! वाचताना नकळत तुम्हीही लयबद्ध आवाजात बोललात. हे बालगीतच तसं आहे. ते ऐकलं किंवा वाचलं तरी आपण भूतकाळात जातो आणि बालपणीच्या गोड आठवणी ताज्या होतात. तेव्हा शाळेत आपण मोठ्या उत्साहाने कोरसमध्ये हे गीत म्हणायचो, पण तुम्ही कधी असा नाचणारा  मोर पाहिलात का? आंब्याचं वन तर आपल्यापैकी बहुतांश जणांनी पाहिलंय. पण, पावसाची चाहूल लागताच आनंदाने नाचणारा मोर पाहणारा खरंच भाग्यवान! अशा भाग्यवानांच्या यादीत तुम्हांलाही  यायची इच्छा आहे का ? जर उत्तर ‘हो’ असेल तर ‘मोराची चिंचोली’ तुमची वाट बघतेय. मोराची चिंचोली. नाव थोडं वेगळं आणि आकर्षक आहे ना…

Enjoy this blog? Please spread the word :)

RSS
EMAIL
Facebook
Facebook
Google+
Google+
http://travelwithdreams.com/tag/offbeat-destination-in-maharashtra
Instagram