• India,  More to Explore

    १.माटवण(Matvan)

    माटवण(Mathvan) मुंबईपासून ४ तासांच्या अंतरावर महाडमध्ये वसलेलं हे गाव! खलाटीला असल्यामुळे डोंगरदऱ्यांतून वाट काढत जाण्याची गरज नाही. दोन्ही बाजूंना हिरवीगार पसरलेली शेतं, धबधबे आणि गावात जवळून वाहणारी सावित्री नदी यांमुळे पुरेपूर निसर्गाची मजा लुटता येते. तसेच पर्यटकांचा खूप जास्त ओढा नसल्यामुळे शांत आणि सुरक्षित जागा म्हणूनही माटवणची निवड करता येईल. येथे गावकऱ्यांशी चर्चा करून व संवाद साधून गावात राहण्याची व जेवणाची सोय उपलब्ध होईल. मद्यपान वर्ज्य आहे.  नदीकडे जाताना स्थानिकाला सोबत घेतले तर जास्त बरे! नदीकिनाऱ्यावर मासेमारीचा अनुभव घेता येईल. तसेच शेती कशी करतात याचंही निरीक्षण करता येईल अन् भटकंती करताना रानमेव्याचा आस्वादही घेता येईल. इथले गावकरी मदतशीर आहेत. कोणतेही गैरवर्तन किंवा मद्यपान न करता गावकऱ्यांशी संवाद साधला तर तुमचा…

Enjoy this blog? Please spread the word :)

RSS
EMAIL
Facebook
Facebook
Google+
Google+
http://travelwithdreams.com/tag/matvan-in-maharashtra
Instagram