-
रांजण खळगे : कधीही न आटणारे !
‘रांजण’ हा शब्द वाचून तुम्हाला काही आठवलं का ? मला तर तहानलेल्या कावळ्याची गोष्ट आठवली. त्याने नाही का, रांजणात लहान – लहान दगड टाकले. त्यामुळे पाण्याची पातळी वाढली. मग तो ते पाणी प्यायला आणि स्वतःची तहान भागवली. अशीच काही रांजणं आहेत महाराष्ट्रातल्या पुणे जिल्ह्यातील शिरूर व अहमदनगर जिल्ह्यातील पारनेर तालुक्याच्या सीमेवर असलेल्या कुकडी नदीमध्ये. पण, ही रांजणं कोणी मनुष्याने बनवली नाहीत, ती आपोआप तयार झाली आहेत. एवढंच नाही तर, “आशिया खंडातील महाकाय जलकुंड” म्हणून त्यांची गिनिज बुकमध्ये नोंदही झाली आहे. त्यांनाच रांजण खळगे म्हणतात. या जलकुंडांचं आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे ती बारमाही आहेत. दुष्काळ पडला तरी आटत नाहीत ! विज्ञान सांगतं, ही नद्यांची भौगोलिक विशेषता आहे. त्या पाण्यासोबत लहानमोठे दगडगोटे वाहून…