-
बटाटा,अंड की कॉफी बिन्स..?
प्रत्येकाच्या आयुष्यात चढउतार हे येतच असतात. आपण त्या घटनेकडे कसे पाहतो यावर पुढच्या गोष्टी ठरतात. अनेकदा संकटं आली की आपण हतबल होतो आणि सरळ देवावर सगळं लादून मोकळे होतो. त्यातूनही काही नाही झालं की नशिबाला दोष देत आयुष्यभर रडत बसतो. अशीच एक रडुबाई होती नयना. मितभाषी, शातं पण लहानसहान गोष्टींचा अतिविचार करणारी. एकेदिवशी कामावरून घरी आली तीच मुसमुसत आईच्या कुशीत शिरली. आईने विचारलं, “नयना,काय झालं ? आल्याआल्याच रडायला लागलीस.” नयना वैतागलेल्या स्वरात आईला म्हणाली, “मी कुणाचं काय वाईट केलंय की माझ्यामागे संकटांचा ससेमिरा लागलायं. एक संपलं की दुसरं समोर असतंच. आई मी थकलेय आता या आयुष्यालाच कंटाळलेय. नको वाटतं आता सगळं”. आईने तिला घट्ट मिठी मारली आणि म्हणाली, “नयना,आज काय…