• India,  More to Explore

  ज्वालादेवी मंदिर : एक शक्तिपीठ

  ज्वालादेवी मंदिर म्हणजे माता सतीच्या ५१ शक्तिपीठांपैकी एक. हिंदू देवता ज्वालामाईला समर्पित हे मंदिर आदिकाळापासून अस्तित्वात असल्याचा उल्लेख महाभारतातही आढळतो. या मंदिराचे वैशिष्ट्य म्हणजे इथे इतर मंदिरांमध्ये असते तशी देवीची मूर्ती नाही. इथे आहे ती अखंड ज्वाला, जी कधीही विझत नाही. लोक तिचीच पूजा करतात. जसे त्रियुगीनारायण मंदिर तिथे असणाऱ्या अखंड धुनीसाठी भाविकांमध्ये प्रसिद्ध आहे, तसेच ज्वालादेवी मंदिर इथे अखंड तेवत असणाऱ्या ज्वालेसाठी !  आश्यर्याची बाब म्हणजे अनेक शोधमोहिमा राबवूनही शास्त्रज्ञांना  या अखंड ज्योतीचं रहस्य कळलेलं नाही. त्यांच्या मते ,ज्वालादेवी मंदिराच्या खाली खोलवर निद्रिस्त ज्वालामुखी आहे. तिथून येणाऱ्या नैसर्गिक वायुमूळे ही ज्वाला कधीही विझत नाही आणि तिलाच इथले लोक दैवी चमत्कार मानतात. म्हणूनच ७०च्या दशकात भारत शासनाने इथला नैसर्गिक वायूचा…

 • BLOG,  India,  More to Explore

  त्रियुगीनारायण : जिथे शिवपार्वती विवाहबंधनात अडकले!

  असं म्हणतात, ‘लग्नगाठ स्वर्गात बांधली जाते, कारण ती पवित्र असते’. म्हणूनच तर विवाहसोहळ्याला खूप महत्त्व आहे, कारण आपण भावनिकदृष्टया त्याच्याशी जोडलेले असतो. त्यामुळे विवाह कुठे करायचा याचाही अगदी कल्पकतेने विचार केला जातो. त्यातूनच उदयाला आलेली कल्पना – डेस्टिनेशन वेडिंग ! अगदी राजसी थाटातील राजमहालांपासून दऱ्याखोऱ्यांतील पर्वतांवर लग्न केली जातात. असंच लग्नासाठी एक हटके डेस्टिनेशन म्हणजे उत्तराखंडमधील त्रियुगीनारायण मंदिर ! ते मंदिर जिथे भगवान शंकर व माता पार्वती यांचा विवाहसोहळा पार पडला.  हा विवाहसोहळा आपल्याला थेट शिवपार्वतीच्या काळात घेऊन जातो. माता पार्वती ही शिवभक्त होती. तिने भगवान शंकराला मिळवण्यासाठी ‘गौरीकुंड’ येथे अखंड तपस्या केली. भगवान शंकर प्रसन्न झाले. त्यांनी गुप्तकाशीमध्ये माता पार्वतीला लग्नाची मागणी घातली. त्यानंतर त्रियुगीनारायण येथे त्यांचा विवाहसोहळा संपन्न झाला. पुराणानुसार त्रियुगीनारायण ही…

 • India,  More to Explore,  शोध अज्ञाताचा.....

  शेटफळ : जिथे सर्पराज्य आहे ! (Shetphal)

  सापाचं नाव काढलं तरी भल्याभल्यांच्या तोंडचं पाणी पळतं, पण महाराष्ट्रात एक असं गाव आहे जिथे लोक साप पाळतात. खासकरून कोब्रा प्रजातीचे विषारी साप !  😥😥😥😥 …..वाचून तुमच्याही तोंडचं पाणी पळालं ना ! Shetpal-Indias-Land-of-Snakes शेटफळ हे एकमेव असं गाव आहे जिथे प्रत्येक घरात साप आढळतात. एवढंच नाही तर घरात सापाला राहण्यासाठी विशिष्ट जागा बनवली जाते. इथले लोक सापाची पूजा करतात. तसेच इथे सापांची अनेक मंदिरंही आहेत. काही घरांच्या भिंतींवरदेखील सापाची आकृती काढलेली आहे. ‘शेटफळ’चे गावकरी म्हणतात की इथे कधीच सापाला मारले जात नाही. कदाचित त्यामुळेच आजतागायत इथे कोणालाही साप चावलेला नाही. इथे शाळा, कॉलेजं यांसोबतच सार्वजनिक ठिकाणीही साप बिनधास्त मोकाट फिरताना दिसतात. इथली मुलंदेखील सापांशी अशी खेळतात जशी एखाद्या खेळण्यासोबत !   snake-village-shetphal मग…

 • India,  More to Explore

  शनिशिंगणापूर – दरवाजे नसलेलं गाव ! (Shani shingnapur – Village with no doors)

  १. शनिशिंगणापूर – दरवाजे नसलेलं गाव ! ( Shani shingnapur – Village with no doors)  नावावरूनच गावात ‘शनी’ देवाची पूजा केली जात असणार हे लक्षात येतं. या गावाच्या नावालाही इतिहास आहे. म्हटलं जातं की एक गुराख्याने अनेक वर्षांपूर्वी जमिनीतून एक काळा दगड वर येताना पाहिला. त्याला आश्चर्य वाटलं. त्याने हातातल्या लाकडी काठीने तो दगड चाचपला आणि पाहतो तर काय ? जिथे त्या काठीचा स्पर्श झाला तिथून रक्ताची धार वाहू लागली. गुराखी घाबरला. अचानक शनिदेव तिथे प्रकट झाले व त्या गुराख्याला म्हणाले , “या जागेवरील हा काळा दगड म्हणजे माझे स्थान आहे. मी सदैव इथे वास्तव्य करेन. या जागेवर कधीही मंदिर बांधू नका, परंतु दर शनिवारी नित्यनियमाने तेलाचा अभिषेक करा.” तेव्हापासून…

 • India,  More to Explore

  एक झलक स्टॅच्यू ऑफ युनिटीची !

  एक झलक स्टॅच्यू ऑफ युनिटीची !       लहानपणी आपण सगळ्यांनीच ‘ एकीचे बळ’ ही गोष्ट वाचली आहे. ती कौटुंबिक स्तरावर सर्व भावांना नेहमी एकजुटीने राहण्याची शिकवण देते. तसाच ‘ स्टॅच्यू ऑफ युनिटी ‘ सर्व भारतीयांना मिळूनमिसळून राहण्याची प्रेरणा देतो. आपणा सगळ्यांनाच माहीत आहे की ३१ ऑक्टोबर २०१८ रोजी आपल्या देशाचे माननीय पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या ‘ स्टॅच्यू ऑफ युनिटी’ चा उद्घाटन सोहळा मोठ्या थाटामाटात पार पडला. सरदार वल्लभभाई पटेल यांच्या १४३ व्या जयंतीचे औचित्य साधून या पुतळ्याचे अनावरण करण्यात आले, पण भारतात इतरही अनेक क्रांतीवीर होऊन गेले मग सरदार पटेलांनाच हा बहुमान का? हा प्रश्न तुम्हालाही पडला का हो? चला मग, एकत्रच उत्तर शोधुया.त्यासाठी सगळ्यात आधी सरदार पटेलांबाबत थोडक्यात जाणून घेऊ. सरदार पटेल हे भारताच्या  स्वातंत्र्यलढ्यातील एक…

 • More to Explore,  Travel Stories

  सफर अविस्मरणीय केरळची…..

  सफर अविस्मरणीय केरळची….. पर्यटन म्हणजे आपल्यापैकी अनेकांच्या जिव्हाळ्याचा विषय. माझ्यासाठी तर अगदी ‘बॅग भरा आणि निघा‘ असाच ! तसं तर मित्र-मैत्रिणींसोबत आपण फिरतोच, पण कुटुंबासोबत जाण्याची मज्जाच वेगळी. त्यात अनेक कुटुंब एकत्र जाणार म्हटल्यावर ‘दुग्धशर्करायोगच’ ! मज्जा तर येईलच, पण प्रत्येकाची आवड वेगळी. म्हणतात ना, ‘व्यक्ती तितक्या प्रकृती‘ . अगदी तसंच . म्हणून आमचं सहलीला जायचं तर ठरलं, पण सगळ्यात मोठा प्रश्न होता “कुठे” ? कारण ठिकाणच असं निवडायचं होतं जिथे लहानांपासून मोठयांपर्यंत सगळ्यांनाच अगदी मनसोक्त सहलीचा आनंद घेता येईल. बराच विचार केला आणि डोळ्यांपुढे आला तो म्हणजे ‘देवांचा देश’ (God’s own country) केरळ – भारतातील सर्वाधिक हिरवाईने नटलेलं राज्य !   पश्चिम घाट आणि अरबी समुद्र यांच्या मध्ये वसलंय…

Enjoy this blog? Please spread the word :)

RSS
EMAIL
Facebook
Facebook
Google+
Google+
http://travelwithdreams.com/tag/incredible-india
Instagram