• Discover the unexplored,  More to Explore

    एक असा ज्वालामुखी ज्याच्या गाभ्यापर्यंत जाता येतं: ट्रिनुकागिगुर ! (Thrihnukagigur Volcano)

    एक असा ज्वालामुखी ज्याच्या गाभ्यापर्यंत जाता येतं: ट्रिनुकागिगुर ! (Thrihnukagigur Volcano) ज्वालामुखी म्हटलं की डोळ्यांसमोर येतो तो डोंगरातून फसफसत निघणारा लाव्हारस अन् धुराचा आगडोंब ! किती भयावह असतो हा ज्वालामुखी ! त्यात फसलेल्यांची अक्षरशः राख होते. एवढं माहित असताना जर तुम्हांला कोणी ‘ ज्वालामुखीच्या गाभ्याशी यायला आवडेल का?’ असं विचारलं तर!        जर तुम्ही साहसवेडे  असाल तर नक्कीच आयुष्यात एकदातरी हे साहस करून बघा. पण ते करण्यासाठी तुम्हांला आइसलँडला यावं लागेल, कारण ट्रिनुकागिगुर ( thrihnukagigur) हा जगातील एकमेव असा ज्वालामुखी आहे ज्याच्या गाभ्यापर्यंत जाता येतं. याचं कारण म्हणजे मुख्यतः एखादा ज्वालामुखी शांत झाला की त्यातील लाव्हा ज्वालामुखीच्या गाभ्यापासून   (magma chamber) मुखापर्यंत थंड होते व तिचा दगड बनतो.…

  • Travel Stories

    पैसा वसूल आइसलँड ( Iceland best Option to Travel )

    पैसा वसूल आइसलँड!!! आइसलँड, म्हणजे आग आणि बर्फ ह्यांचा देश, अशी याची ख्याती आहे. कारणही तसेच आहे, एकीकडे प्रचंड असे हिमनग तर दुसरीकडे रुद्र ज्वालामुखी! हिवाळ्यात निर्माण होणाऱ्या जादुई बर्फाळ गुहा आणि हजारो वर्षांपासून निद्रिस्त असलेल्या ज्वालामुखीच्या जबड्यातली गुहा. काय तो परस्पर विरोधी योग! दोनीही थक्क करणारे. २०१७ चा जुलै महिना. मी आणि रश्मीता माझ्या वाढदिवसाचे निमित्त साधून या थरारक ट्रिप साठी सज्ज झालो होतो. तसा अभ्यास केला होता ट्रिपचा, पण अभ्यास कितीही करा भीती तर वाटतेच. त्यात किती थंडी असेल, आइसलँड म्हणजे बर्फच बर्फ असेल कि काय….. या आणि अशा वेगवेगळ्या प्रश्नांनी थोडा गोंधळ उडाला. पण एकदा का ठरलं कि ट्रिप करायचीच…. थंडी चे जॅकेट्स, उबदार कपडे, ट्रेकिंग चे…