India,  More to Explore,  शोध अज्ञाताचा.....

शेटफळ : जिथे सर्पराज्य आहे ! (Shetphal)

सापाचं नाव काढलं तरी भल्याभल्यांच्या तोंडचं पाणी पळतं, पण महाराष्ट्रात एक असं गाव आहे जिथे लोक साप पाळतात. खासकरून कोब्रा प्रजातीचे विषारी साप !  😥😥😥😥 …..वाचून तुमच्याही तोंडचं पाणी पळालं ना !

Shetpal-Indias-Land-of-Snakes
शेटफळ हे एकमेव असं गाव आहे जिथे प्रत्येक घरात साप आढळतात. एवढंच नाही तर घरात सापाला राहण्यासाठी विशिष्ट जागा बनवली जाते. इथले लोक सापाची पूजा करतात. तसेच इथे सापांची अनेक मंदिरंही आहेत. काही घरांच्या भिंतींवरदेखील सापाची आकृती काढलेली आहे. ‘शेटफळ’चे गावकरी म्हणतात की इथे कधीच सापाला मारले जात नाही. कदाचित त्यामुळेच आजतागायत इथे कोणालाही साप चावलेला नाही. इथे शाळा, कॉलेजं यांसोबतच सार्वजनिक ठिकाणीही साप बिनधास्त मोकाट फिरताना दिसतात. इथली मुलंदेखील सापांशी अशी खेळतात जशी एखाद्या खेळण्यासोबत ! 
 
snake-village-shetphal

मग तुम्ही कधी भेट देताय शेटफळला ? नागपंचमीला जर खऱ्याखुऱ्या सापाची पूजा करायची तर नक्की या, कारण इथले साप त्रासदायक नाहीत. पण कृपया त्यांना दूध पाजू नका. यामागचं मुख्य कारण म्हणजे साप हा शीत रक्ताचा (cold-blooded) प्राणी आहे, त्यामुळे दुधाचे सेवन त्याच्या मृत्यूचे कारण बनू शकते. 

Shetpal Village
शेटफळ आहे कुठे ? 🤔
महाराष्ट्र राज्यातील सोलापूर जिल्ह्यात करमाळा तालुक्यात शेतफळ वसलेलं आहे. 🤗
 
शेटफळला जायचं कसं ? 🤨
१. सोलापूर, पंढरपूर, मंगळवेढा, कुरुडवाडी व बार्शीहून शेटफळला जाण्यासाठी राज्यशासनाच्या 🚌🚌एसटी  बसेस 🚌🚌 उपलब्ध आहेत. 
२. 🚂🚂 ट्रेनने 🚂🚂 जाणार असाल तर सोलापूर जंक्शनला उतरून कॅब किंवा बसने शेटफळला पोहोचता येते. तसेच मोडनिंब व अष्टी रेल्वेस्थानक शेटफळपासून जवळ आहेत. 

नमस्कार मंडळी, मी पूजा.... पूजा नरेश जाधव. आपल्या ट्रॅव्हल विथ ड्रीम्स या ब्लॉगच्या माध्यमातून नवनवीन पर्यटनस्थळांची माहिती तुमच्यासमोर आणतेय. गेल्याच वर्षी तोलानी वाणिज्य महाविद्यालयातून B. Com चं शिक्षण पूर्ण केलं. सध्या स्पर्धा परीक्षांची तयारी करतेय. त्यातून वेळ मिळाला की सरळ मोर्चा वळतो तो आपलं सगळ्यात आवडतं काम करायला ! हेच आपल्या ब्लॉगसाठी नवीन पोस्ट बनवण्याकडे.... यासोबत मला नवनवीन पदार्थ बनवायला आणि खायलाही खूप आवडतात. माझा दुसरा आवडता छंद म्हणजे झाडं लावणे आणि त्यांना न्याहाळत बसणे. अधूनमधून पुस्तकंही वाचते. त्यामध्ये परीकथा, साहसकथा आणि प्रवासवर्णनं वाचण्याकडे माझा जास्त कल असतो. या सगळ्यासोबत कॉलेजमध्ये असताना ज्यूडोचं प्रशिक्षणही घेतलं. नंतर पदवीच्या शेवटच्या वर्षाला असताना महाराष्ट्र टाइम्ससोबत "कॉलेज क्लब रिपोर्टर" म्हणूनही कामाचा अनुभव घेतला. या सगळ्या उद्योगांव्यतिरिक्त मला मनसोक्त भटकंती करायला आणि त्या त्या ठिकाणचे पारंपारिक पदार्थ चाखायलाही खूप आवडतं. तिथली संस्कृती अनुभवणं, लोकांच्या लहानसहान गोष्टींचं निरीक्षण करणं यात वेगळीच मजा येते. तशी स्वप्नं बरीच आहेत, पण त्यातलं एक म्हणजे आपला हा ब्लॉग यशस्वी करायचा. तुम्ही सगळे या प्रवासात आमच्यासोबत आहात, त्यामुळे काळजीचं काही कारणच नाही. ...... खूप बोलले ना. आता थोडं थांबते. तसे आपण भेटत राहूच नवीन पोस्टसोबत. तुम्हांला पोस्ट आवडली का हे जरूर कळवा हं. वाट बघतेय तुमच्या प्रतिक्रियेची.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Enjoy this blog? Please spread the word :)

RSS
EMAIL
Facebook
Facebook
Google+
Google+
http://travelwithdreams.com/shetphal-kingdom-of-snakes
Instagram