India,  More to Explore

चमकत्या ताऱ्यांचा दर्या : वाधू बेट ( Sea of Stars : Vaadhoo Island )


चमकत्या ताऱ्यांचा दर्या : वाधू बेट ( Sea of Stars : Vaadhoo Island )

 

तुम्ही निळ्या जादुबद्दल काही ऐकलंय का 🤔? खरंतर निसर्गानेच निर्माण केलीय ही जादू ! या जादूचा प्रत्यक्ष अनुभव घ्यायचा असेल तर तुम्हांलाही मालदीवच्या वाधू बेटावर यावं लागेल, ज्याला निळं जादुई बेट असं देखील म्हणतात. गोंधळलात ? निसर्गाचे आविष्कारच असे आहेत की ते कधीकधी बुचकळ्यात पाडतात. आता हेच बघा ना ! आकाशातले काही तारे समुद्रात पडले अन् निळ्या जादूचा उदय झाला. आता त्याच समुद्राला सगळे निळे जादुई बेट, Sea of Stars, Ocean of Stars म्हणू लागले. खरंच परीकथा वाटतेय ना !

 

रात्रीच्या वेळी मालदीवच्या वाधू बेटावर दिसणारा हा नजारा म्हणजे अप्रतिम🤗 ! रात्री या बेटावर वीज नसते, पण या निळ्या जादूने संपूर्ण बेट झगमगाटून जाते. यामागचं रहस्य आहे फायटोप्लँक्टन (Phytoplankton) नावाचे शेवाळासारखे दिसणारे पाण्यावर तरंगणारे सूक्ष्म जीवाणू ! सगळ्यात सुंदर नैसर्गिक प्रकाश देणारे हे जीवाणू खूप दुर्मीळ आहेत. दिवसा जेव्हा त्यांच्यावर सूर्यप्रकाश पडतो, तेव्हा ते सोनेरी दिसतात आणि रात्री निळ्या रंगात चमकतात. दिवसा प्रखर सूर्यप्रकाशामुळे आपण तितकं निरीक्षण करत नाही, पण रात्रीच्या गडद अंधारात जेव्हा ते चमकतात तेव्हा आकाशातले तारे पाण्यावर तरंगत असल्याचा भास होतो आणि आपण डोळ्यांनी निसर्गाचा चमत्कार जमेल तितका नजरकैद करण्यात गुंग होऊन जातो.
मग तुम्ही कधी भेट देताय या निळ्या जादुई बेटाला ?

 

 

 

Pic 1 & 2 Source

Written and edited by Pooja jadhav , Published by T.W.D

Please Comment below to share your feedback

Follow T.W.D. on Facebook , Instagram , Google Plus & Twitter for more travel stories & explore the known india

नमस्कार मंडळी, मी पूजा.... पूजा नरेश जाधव. आपल्या ट्रॅव्हल विथ ड्रीम्स या ब्लॉगसाठी आकाशसोबत लिखाणाची धुरा सांभाळतेय. गेल्याच वर्षी तोलानी वाणिज्य महाविद्यालयातून B. Com चं शिक्षण पूर्ण केलं. सध्या स्पर्धा परीक्षांची तयारी करतेय. त्यातून वेळ मिळाला की सरळ मोर्चा वळतो तो आपलं सगळ्यात आवडतं काम करायला ! हेच आपल्या ब्लॉगसाठी नवीन पोस्ट बनवण्याकडे.... यासोबत मला नवनवीन पदार्थ बनवायला आणि खायलाही खूप आवडतात. माझा दुसरा आवडता छंद म्हणजे झाडं लावणे आणि त्यांना न्याहाळत बसणे. अधूनमधून पुस्तकंही वाचते. त्यामध्ये परीकथा, साहसकथा आणि प्रवासवर्णनं वाचण्याकडे माझा जास्त कल असतो. या सगळ्यासोबत कॉलेजमध्ये असताना ज्यूडोचं प्रशिक्षणही घेतलं. नंतर पदवीच्या शेवटच्या वर्षाला असताना महाराष्ट्र टाइम्ससोबत "कॉलेज क्लब रिपोर्टर" म्हणूनही कामाचा अनुभव घेतला. या सगळ्या उद्योगांव्यतिरिक्त मला मनसोक्त भटकंती करायला आणि त्या त्या ठिकाणचे पारंपारिक पदार्थ चाखायलाही खूप आवडतं. तिथली संस्कृती अनुभवणं, लोकांच्या लहानसहान गोष्टींचं निरीक्षण करणं यात वेगळीच मजा येते. तशी स्वप्नं बरीच आहेत, पण त्यातलं एक म्हणजे आपला हा ब्लॉग यशस्वी करायचा. तुम्ही सगळे या प्रवासात आमच्यासोबत आहात, त्यामुळे काळजीचं काही कारणच नाही. ...... खूप बोलले ना. आता थोडं थांबते. तसे आपण भेटत राहूच नवीन पोस्टसोबत. तुम्हांला पोस्ट आवडली का हे जरूर कळवा हं. वाट बघतेय तुमच्या प्रतिक्रियेची.

4 Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *