India,  More to Explore

कथा लज्जतदार सांभरची ! 😜

कथा लज्जतदार सांभरची ! (Sambhar Ek Number) 😋

“अण्णा, इडली के साथ सांभर (Sambhar) थोडा ज्यादा डालना हां” , “इथल्या उडिपी रेस्तरॉंमध्ये सांभर (Sambhar) एक नंबर मिळतं ” , असे संवाद अनेकदा आपल्या कानावर पडतात. जेव्हा – जेव्हा आपण इडली – डोसा खातो तेव्हा त्यात सांभर (Sambhar)  हे “मस्ट” असतं. आता त्याची फक्त महती सांगतेय तरी त्याचा सुगंध येतोय अन आपसूकच तोंडाला पाणी सुटतंय. आपणा सगळ्यांनाच वाटतं की सांभर (Sambhar) ही दक्षिणेकडील लोकांची खासियत आहे आणि सांभरचा शोधही त्यांनीच लावला. पण इथला इतिहास काहीतरी वेगळंच सांगतोय. ऐकायचं ? 

    त्याचं झालं असं की श्री छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतण्या व सावत्र भाऊ व्यंकोजीराजे यांचे ज्येष्ठ सुपुत्र शाहुजीराजे १ यांना कला – साहित्यासोबत जेवणाचीही खूप आवड होती. त्यांना कोकम टाकलेली आमटी खूप आवडत असे. एका प्रसंगी त्यांना ती आमटी खाण्याची खूप इच्छा झाली, पण दुर्दैव ! त्या वेळी काही कारणास्तव कोकम उपलब्ध नव्हते. त्यामुळे चिंचेचा कोळ टाकून ही आमटी बनवली आणि काय आश्चर्य ! तूरडाळ, भाज्या, मसाले व चिंच यांचा अफलातून मेळ या पक्वान्नात जमला. नेमके तेव्हाच शिवरायांचे पुत्र शंभूराजे उर्फ संभाजीराजे शाहुजीराजांच्या भेटीस तंजावरला आले होते. त्यावेळी पहिल्यांदाच ती नवीन आमटी त्यांना वाढण्यात आली आणि ‘संभाचा आहार” ( Sambha’s food) म्हणून या पक्वान्नाचे सांभर ( Sambhar ) असे नामकरण झाले. त्यानंतर तंजावरच्या राजमहालात सांभरला शाही पदार्थाचा मान मिळाला. पण हा सांभर ( Sambhar ) शाहुजीराजांच्या आचाऱ्यांनी बनवला की त्यांनी स्वतः याबद्दल खात्रीशीर माहिती उपलब्ध नाही. याचाच अर्थ सांभर ( Sambhar ) चा शोध मराठ्यांनी लावला पण तामिळनाडूमध्ये ! 😊

कालानुरूप या सांभर (Sambhar) मध्ये अनेक नवनवीन प्रकार आले, पण त्याचं मराठी कनेक्शन मात्र इतकी वर्ष उलटली तरी अद्याप टिकून आहे. 
मग आता तुम्हीही घरी नक्की करून बघा मराठा स्पेशल सांभर !

नमस्कार मंडळी, मी पूजा.... पूजा नरेश जाधव. आपल्या ट्रॅव्हल विथ ड्रीम्स या ब्लॉगच्या माध्यमातून नवनवीन पर्यटनस्थळांची माहिती तुमच्यासमोर आणतेय. गेल्याच वर्षी तोलानी वाणिज्य महाविद्यालयातून B. Com चं शिक्षण पूर्ण केलं. सध्या स्पर्धा परीक्षांची तयारी करतेय. त्यातून वेळ मिळाला की सरळ मोर्चा वळतो तो आपलं सगळ्यात आवडतं काम करायला ! हेच आपल्या ब्लॉगसाठी नवीन पोस्ट बनवण्याकडे.... यासोबत मला नवनवीन पदार्थ बनवायला आणि खायलाही खूप आवडतात. माझा दुसरा आवडता छंद म्हणजे झाडं लावणे आणि त्यांना न्याहाळत बसणे. अधूनमधून पुस्तकंही वाचते. त्यामध्ये परीकथा, साहसकथा आणि प्रवासवर्णनं वाचण्याकडे माझा जास्त कल असतो. या सगळ्यासोबत कॉलेजमध्ये असताना ज्यूडोचं प्रशिक्षणही घेतलं. नंतर पदवीच्या शेवटच्या वर्षाला असताना महाराष्ट्र टाइम्ससोबत "कॉलेज क्लब रिपोर्टर" म्हणूनही कामाचा अनुभव घेतला. या सगळ्या उद्योगांव्यतिरिक्त मला मनसोक्त भटकंती करायला आणि त्या त्या ठिकाणचे पारंपारिक पदार्थ चाखायलाही खूप आवडतं. तिथली संस्कृती अनुभवणं, लोकांच्या लहानसहान गोष्टींचं निरीक्षण करणं यात वेगळीच मजा येते. तशी स्वप्नं बरीच आहेत, पण त्यातलं एक म्हणजे आपला हा ब्लॉग यशस्वी करायचा. तुम्ही सगळे या प्रवासात आमच्यासोबत आहात, त्यामुळे काळजीचं काही कारणच नाही. ...... खूप बोलले ना. आता थोडं थांबते. तसे आपण भेटत राहूच नवीन पोस्टसोबत. तुम्हांला पोस्ट आवडली का हे जरूर कळवा हं. वाट बघतेय तुमच्या प्रतिक्रियेची.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Enjoy this blog? Please spread the word :)

RSS
EMAIL
Facebook
Facebook
Google+
Google+
http://travelwithdreams.com/sambhar-ek-number
Instagram