Be aware of momo challenge
Social Corner

मोमो खायचे की खेळायचं ?

नमस्कार मंडळी मी तुम्हांला म्हटलं होतं ना थोडी उसंत मिळाली की आपोआप लेखणी हातात येते आणि डोक्यात विचार घर करू लागतात. आज तशी उसंत नव्हती पण अभ्यासाचा भाग म्हणून वर्तमानपत्र वाचताना एक बातमी पाहिली आणि खुप अस्वस्थ वाटू लागलं, म्हणून मग हा लेखप्रपंच करण्याचा विचार आला. बातमी होती ”A 25 year-old youth from Mahanga allegedly killed himself on Wednesday, apparently a victim of the deadly online game Momo Challenge.” वाटलं. ” देवाने दिलेलं सुंदर आयुष्य या मुलाने इतक्या सहज संपवलं. आत्महत्या करताना काहीच वाटलं नसेल का त्याला ? लहानपणापासून पाहिलेले एखादं स्वप्न, महत्त्वाकांक्षा किंवा कौटुंबिक बंध
कोणीच त्याला आयुष्य मातीमोल करण्यापासून वाचवू शकलं नसेल? की तो मोमो चॅलेंजच्या इतका आहारी गेला की त्याला परतण्याचे सगळे दरवाजे बंद झाले असं वाटलं असेल. तो गेम खेळला. त्याने सो कॉल्ड मोमो चॅलेंज स्वीकारलं आणि ते पूर्ण करण्याच्या नादात
आत्महत्याही केली. जीव देऊन मोकळा झाला. पण ज्या आई-वडिलांनी त्याला गेली पंचवीस वर्षे वाढवलं, त्याचे सगळे हट्ट पूर्ण केले, त्याच्या आनंदासाठी रात्रीचा दिवस केला असेल त्यांचं काय? त्याच्यामागे ‘दादा’साठी रडणाऱ्या त्या लहान भावंडांचं काय? हळूहळू ते सावरतील या दुःखातून आणि नेहमीचंआयुष्य जगू लागतील, पण एक प्रश्न मात्र अनुत्तरितच राहतो – “आजची तरुणाई खरंच इतकी बेजबाबदार आणि मूर्ख आहे का कि कोणीही त्यांना  मूर्ख (आपल्या भाषेत उल्लू ) बनवू शकतो आणि सापळ्यात अडकवून त्यांचा आयुष्यच उद्ध्वस्त करू शकतो?” जर आपण मुलं हट्टाने आई-वडिलांकडून पाहिजे ती गोष्ट मागून घेतो तर आपल्यात नक्कीच या गोष्टींना ठामपणे नाकारण्याचीही ताकद आहे, पण आपण त्यांच्या प्रलोभनांना बळी पडतो.

असं म्हणतात तारुण्यात सळसळतं रक्त असतं. लाथ मारेन तिथे पाणी काढेन इतकी ताकद असते तरुणाईमध्ये आणि म्हणूनच आपण आव्हानं स्वीकारतो आणि ती लीलया पेलतोही. पण ती आव्हानं वेगळी असतात. जगण्यातल्या संघर्षांची, करिअरच्या टॉप लेव्हलची, नानाविध महत्त्वाकांक्षा पूर्ण करण्यासाठी झटण्याची ! आणि आव्हानं तीच असतात जी पूर्ण केल्यानंतर तुम्हाला रात्री शांत आणि समाधानाची झोप मिळते, ज्यामुळे तुमचा नावलौकिक वाढतो, ज्यामुळे तुमच्या आयुष्यात स्थैर्य येते. पण आजच्या जगात या आव्हानांची संपूर्ण व्याख्याच बदलली आहे. ती इंटरनेट व ग्लोबलायझेशननेही बदलवली. आता ब्ल्यू व्हेल, मोमो चॅलेंज, शॉट चॅलेंज, सेक्स चॅलेंज यासारखे विचित्र आणि वाह्यात चॅलेंजेस पूर्ण करण्यात तरुणाई धन्यता मानते. इतकंच नाही तर जीवही गमावते. याआधी ब्लू व्हेलमुळे जगभरात अनेकांनी जीव गमावले. त्यानंतर आता अर्जेंटिना, चेन्नई आणि ओडिशामध्येही मोमो चॅलेंज पूर्ण करताना मुलांनी आत्महत्या केल्याचे उघड झाले. यासाठी जितकी मुलं जबाबदार आहेत तितकेच पालकही ! कारण तुम्ही मुलांना त्यांच्या हट्टाखातर फोन तर घेऊन देता, पण त्याचा योग्य वापर कसा करायचा हेच शिकवत नाही. अनेकदा मुलं एकाकी झाल्यामुळे अशा गोष्टींच्या आहारी जातात, पण जर आता वयाच्या सोळाव्या वर्षात आम्ही सुजाण होतोय तर मग ही चुकीची पावलं का पडतात हाही प्रश्न आहेच.

शांतपणे विचार केला तर लक्षात येईल, आजच्या तरुणाईला योग्य मार्गदर्शकांची आणि समुपदेशकांची गरज आहे. जर आम्हाला कोणतीही गोष्ट तिच्या बऱ्या-वाईट परिणामांसह नीट समजावली तर आम्ही समजून घेतो आणि हो आमच्यात मेहनत करण्याची व लाथ मारेन तिथे पाणी काढण्याची क्षमता आहे. गरज आहे ती फक्त ही क्षमता योग्य ठिकाणी वापरण्यास शिकवणाऱ्या शिक्षकांची. त्यामुळे आमच्या आधीच्या पिढीला म्हणजेच आमच्या सीनिअर्सना ही कळकळीची विनंती आहे की जर तुमच्या पाहण्यात असे तरुण-तरुणी आले तर कृपया तुम्ही त्यांचे योग्य समुपदेशन करा. आपली तरुणाई कलाकारांना खूप फॉलो करते. तरुणाईवर

शांतपणे विचार केला तर लक्षात येईल, आजच्या तरुणाईला योग्य मार्गदर्शकांची आणि समुपदेशकांची गरज आहे. जर आम्हाला कोणतीही गोष्ट तिच्या बऱ्या-वाईट परिणामांसह नीट समजावली तर आम्ही समजून घेतो आणि हो आमच्यात मेहनत करण्याची व लाथ मारेन तिथे पाणी काढण्याची क्षमता आहे. गरज आहे ती फक्त ही क्षमता योग्य ठिकाणी वापरण्यास शिकवणाऱ्या शिक्षकांची. त्यामुळे आमच्या आधीच्या पिढीला म्हणजेच आमच्या सीनिअर्सना ही कळकळीची विनंती आहे की जर तुमच्या पाहण्यात असे तरुण-तरुणी आले तर कृपया तुम्ही त्यांचे योग्य समुपदेशन करा. आपली तरुणाई कलाकारांना खूप फॉलो करते. 

तरुणाईवर
त्यांचा खूप प्रभाव असतो. त्यामुळे त्यांनीही आपल्या चाहत्यांना या सगळ्यापासून दूर राहण्याचे आवाहन केलं तरी अर्धी लढाई आपण जिंकतो. याव्यतिरिक्त शाळा-कॉलेजांमध्येही इंटरनेट-मोबाईलचा वापर, त्यातून निर्माण होणारे धोके व या सगळ्यापासून दूर राहण्याचे मार्ग यासंबंधी गेस्ट लेक्चर्स आयोजित करून मुलांना यापासून परावृत्त करता येईल. हे सगळं दिसतंय तितकं सोपं नक्कीच नाही, पण या जगात अशक्य असं
ही काहीच नाही. थोडे प्रयत्न केले तर नक्कीचआपण या विळख्यातून बाहेर पडू आणि तरुणाईला गिळंकृत करायला टपलेल्या या अजस्त्र अजगराला लीलया फाडून टाकू.

नमस्कार मंडळी, मी पूजा.... पूजा नरेश जाधव. आपल्या ट्रॅव्हल विथ ड्रीम्स या ब्लॉगच्या माध्यमातून नवनवीन पर्यटनस्थळांची माहिती तुमच्यासमोर आणतेय. गेल्याच वर्षी तोलानी वाणिज्य महाविद्यालयातून B. Com चं शिक्षण पूर्ण केलं. सध्या स्पर्धा परीक्षांची तयारी करतेय. त्यातून वेळ मिळाला की सरळ मोर्चा वळतो तो आपलं सगळ्यात आवडतं काम करायला ! हेच आपल्या ब्लॉगसाठी नवीन पोस्ट बनवण्याकडे.... यासोबत मला नवनवीन पदार्थ बनवायला आणि खायलाही खूप आवडतात. माझा दुसरा आवडता छंद म्हणजे झाडं लावणे आणि त्यांना न्याहाळत बसणे. अधूनमधून पुस्तकंही वाचते. त्यामध्ये परीकथा, साहसकथा आणि प्रवासवर्णनं वाचण्याकडे माझा जास्त कल असतो. या सगळ्यासोबत कॉलेजमध्ये असताना ज्यूडोचं प्रशिक्षणही घेतलं. नंतर पदवीच्या शेवटच्या वर्षाला असताना महाराष्ट्र टाइम्ससोबत "कॉलेज क्लब रिपोर्टर" म्हणूनही कामाचा अनुभव घेतला. या सगळ्या उद्योगांव्यतिरिक्त मला मनसोक्त भटकंती करायला आणि त्या त्या ठिकाणचे पारंपारिक पदार्थ चाखायलाही खूप आवडतं. तिथली संस्कृती अनुभवणं, लोकांच्या लहानसहान गोष्टींचं निरीक्षण करणं यात वेगळीच मजा येते. तशी स्वप्नं बरीच आहेत, पण त्यातलं एक म्हणजे आपला हा ब्लॉग यशस्वी करायचा. तुम्ही सगळे या प्रवासात आमच्यासोबत आहात, त्यामुळे काळजीचं काही कारणच नाही. ...... खूप बोलले ना. आता थोडं थांबते. तसे आपण भेटत राहूच नवीन पोस्टसोबत. तुम्हांला पोस्ट आवडली का हे जरूर कळवा हं. वाट बघतेय तुमच्या प्रतिक्रियेची.

One Comment

  • Trushant

    विचार करायला लावणारा अप्रतिम लेख . विषयाची मांडणी अगदी सहज आणि ओघवत्या शैलीत केली आहे. असे आणखी लेख वाचायला आवडतील.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Enjoy this blog? Please spread the word :)

RSS
EMAIL
Facebook
Facebook
Google+
Google+
http://travelwithdreams.com/momo-khayche-ke-khelayche
Instagram