१.माटवण(Matvan)

More to Explore भटकंती वर्षाऋतूतली!
Spread the love

माटवण(Mathvan)

मुंबईपासून ४ तासांच्या अंतरावर महाडमध्ये वसलेलं हे गाव! खलाटीला असल्यामुळे डोंगरदऱ्यांतून वाट काढत जाण्याची गरज नाही. दोन्ही बाजूंना हिरवीगार पसरलेली शेतं, धबधबे आणि गावात जवळून वाहणारी सावित्री नदी यांमुळे पुरेपूर निसर्गाची मजा लुटता येते. तसेच पर्यटकांचा खूप जास्त ओढा नसल्यामुळे शांत आणि सुरक्षित जागा म्हणूनही माटवणची निवड करता येईल. येथे गावकऱ्यांशी चर्चा करून व संवाद साधून गावात राहण्याची व जेवणाची सोय उपलब्ध होईल. मद्यपान वर्ज्य आहे.  नदीकडे जाताना स्थानिकाला सोबत घेतले तर जास्त बरे! नदीकिनाऱ्यावर मासेमारीचा अनुभव घेता येईल. तसेच शेती कशी करतात याचंही निरीक्षण करता येईल अन् भटकंती करताना रानमेव्याचा आस्वादही घेता येईल. इथले गावकरी मदतशीर आहेत. कोणतेही गैरवर्तन किंवा मद्यपान न करता गावकऱ्यांशी संवाद साधला तर तुमचा प्रवास अधिक सुखकर होईल. या प्रवासात महाडमधील पांडव लेणीही तुम्हांला पाहता येतील. हे ठिकाण कौटुंबिक सहल किंवा ग्रुप टूरसाठी योग्य आहे.

जायचे कसे?
• खाजगी वाहनाने अगदी गावात पोहोचता येते.
• एसटीचाही स्वस्त पर्याय उपलब्ध आहे. महाडपर्यंत एसटीने जाऊन तिथून पुढे रिक्षा किंवा टमटमने जाता येते.

 

Edited & Written by Pooja Jadhav

 

Please Comment below to share your feedback

Follow T.W.D. on Facebook , Instagram , Google Plus & Twitter for more travel stories & explore the known india

1 thought on “१.माटवण(Matvan)

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *