८. लोणावळा धबधबा (Lonavala Waterfall)

More to Explore भटकंती वर्षाऋतूतली!
Spread the love

[kc_row use_container=”yes” force=”no” column_align=”middle” video_mute=”no” _id=”940123″][kc_column width=”12/12″ video_mute=”no” _id=”692358″]

लोणावळा धबधबा
[kc_column_text _id=”974555″]

लोणावळा धबधबा (Lonavala Waterfall) 

लोणावळा – खंडाळ्याला अगदी सामान्य माणसापासून बॉलीवूडकरांपर्यंत सगळ्यांनीच डोक्यावर घेतलं. तिथलं निसर्गसौंदर्यच इतकं अप्रतिम की सहज कोणालाही भुरळ पडावी. पावसाळ्यात तर उंचावरून कोसळणाऱ्या शुभ्र जलप्रपातांमुळे या सौंदर्याला आणखी ‘”चार चाँद” लागतात आणि पर्यटक तिथे आकर्षिले जातात. घाटातून जाताना अनेक धबधबे दिसतात, पण “लोणावळा” धबधब्याची बातच न्यारी !

गजबजलेल्या भुशी धरणापासून थोडं पुढे गेल्यावर उजव्या बाजूला पार्किंगसाठी एक मोठी जागा आहे. तिथे चहा, गरमागरम भजी व मसालेदार भुट्टा विकणारे लहान-लहान स्टॉल्स आहेत. तिथून एक छोटा कडा उतरल्यावर या धबधब्याचं दर्शन होतं, पण तिथे जाण्यासाठी कोणतीही दिशादर्शक पाटी नाही. त्यामुळे या स्थानिक विक्रेत्यांना विचारतच मार्गक्रमणा करावी लागते. १५ ते २० मिनिटं झाडीतून वाट काढत व खडकाळ रस्त्यावरून तोल सावरत चालल्यानंतर धबधब्याच्या पायथ्याशी पोहोचता येतं. तिथे मनमुराद आनंद घेतल्यानंतर परतीच्या वेळी पार्किंग क्षेत्रात उंटावरून मारलेली रपेटही एक मस्त अनुभव देऊन जाते. त्यामुळे कमी वर्दळ आणि सोपा रस्ता असलेला हा धबधबा यंदा तुमच्या मान्सून पर्यटनाचा भाग होऊ शकतो.

जायचे कसे ?
१. मुंबई व पुण्याहून खाजगी वाहनाने मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे मार्गे भुशी धरणापर्यंत जाता येते. तिथून पुढे चालत लोणावळा धबधबा गाठावा लागतो.
२. ट्रेनने जाणार असाल तर लोणावळा स्थानकावर उतरून तिथून रिक्षा किंवा टॅक्सीने जाता येते.
फोटो : google

[/kc_column_text][/kc_column][/kc_row]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *