हजारो टेकड्यांचा भूप्रदेश : रुवांडा ( Land of Thousand Hills : Rwanda )

Spread the love


हजारो टेकड्यांचा भूप्रदेश : रुवांडा ( Land of Thousand Hills : Rwanda )

Phoo Belongs to Google Search
Land of Thousands Hills

रुवांडा…… नाव ऐकूनच पहिलं आश्चर्य वाटलं ना ! कधीही ऐकिवात न आलेला हा देश म्हणजे निसर्गाने मुक्तहस्ते केलेली सौंदर्याची उधळण असेल, असं नाव वाचून तरी नक्कीच वाटलं नसेल. पण १०००हून अधिक टेकड्या, जिकडेतिकडे हिरवळ, रंगीबेरंगी प्राणीपक्षी यांनी संपन्न असलेला रुवांडा म्हणजे निसर्गप्रेमींसाठी मेजवानीच आहे. जसजशी आपण माहिती घेत जाऊ, तसे तुम्हीदेखील ‘रुवांडा’च्या प्रेमात पडाल एवढं नक्की !

 

 

 

 

 

Photo Belongs to Google search
Map of Rwanda

रुवांडा नेमका आहे तरी कुठे ? (Where Rwanda is located?)
आफ्रिकेच्या भूमीत मध्यपूर्वेला वसलेला हा छोटासा देश आहे. “भूप्रदेशांनी वेढलेला” युगांडा, “घनदाट अरण्य व सरोवरांचे माहेरघर” टांझानिया, “दाट लोकसंख्येचा” बुरुंडी व “नैसर्गिक साधनसंपत्तीने युक्त” काँगोचे लोकशाही प्रजासत्ताक हे रुवांडाचे शेजारी देश आहेत.

 

 

 

 

 

 

 

 

Photo Belongs to Google
Currency of Rwanda

भौगोलिक स्थिती व इतर माहिती ( geographical and other necessary information) :
२६,३३८ चौरस किलोमीटर विस्तृत प्रदेशावर वसलेल्या रुवांडाची लोकसंख्या जवळजवळ ११.७८ लक्ष आहे. “आफ्रिकेतील उद्योगजगताचा केंद्रबिंदू कागाली” ही रुवांडाची राजधानी आहे. पर्यटन, खाणकाम व शेती हे इथले प्रमुख व्यवसाय आहेत. किन्यारुवांडा (Kinyarwanda), इंग्रजी, फ्रेंच आणि किस्वाहिली ( Kiswahili ) या भाषा इथे बोलल्या जातात. तसेच इथे औद्योगिक व आर्थिक क्षेत्रात होणाऱ्या बदलांमुळे 4G नेटवर्क सुविधा उपलब्ध आहे. त्यामुळे आपण कुठे अरण्यात वगैरे आलोय असं अजिबात वाटत नाही. 😁 फक्त इथे जाण्यापूर्वी स्वतःची शारीरिक तपासणी करून घेणं आवश्यक आहे. तसेच मलेरिया व पीतज्वर लसीकरण प्रमाणपत्र ( Yellow fever vaccination certificate ) सादर करणंही अत्यावश्यक आहे. रुवांडन फ्रॅंक ( Rwandan Franc i.e. FRw ) हे चलन इथे वापरात आहे. तसेच यूएस डॉलर मध्येही व्यवहार करता येतो.

सध्या १२.९७ FRw = १ ₹ आहे.

 

 

 

Kwita Zina ( Rwanda’s Gorilla Naming Ceremony )

रुवांडामध्ये पर्यटनासाठी अनुकूल काळ कोणता ? (Best time to visit Rwanda)
संपूर्ण वर्षभर तापमान २४° ते २७° सेल्सिअस असल्यामुळे रुवांडा बाराही महिने पर्यटनासाठी उत्कृष्ट देश आहे. तसं जून-जुलै-ऑगस्ट आणि डिसेंबरच्या मध्यापासून ते मार्चच्या उत्तरार्धापर्यंतचा काळ राष्ट्रीय प्राणिसंग्रहालयांंना भेट देण्यासाठी उत्तम आहे. या काळात गोरिला-चिंपांझी ट्रॅकिंगला खूप वाव असतो. सप्टेंबर महिन्यात क्विटा इझिना (KwitaIzina Ceremony) या समारंभामध्ये नुकत्याच जन्मलेल्या गोरीलांचे नामकरण पार पडते. तसेच हा काळ हायकिंगसाठी देखील उपलब्ध आहे. एप्रिल – मे मध्ये पावसाळा असल्याकारणाने पर्यटकांची गर्दी तर कमी असतेच पण गोरिला निरीक्षणाची परवानगी मिळणंही सोपं जातं.


 

 

 

 

Volcanoes National Park-Rwanda

इथली प्रमुख आकर्षणं कोणती आहेत ? ( Main tourist attractions in Rwanda)
आफ्रिकेतील निसर्गनिर्मित आश्चर्यांची अनुभूती करताना सगळ्यात मोठ्या संरक्षित वर्षावनातून फेरफटका मारण्याचा, मोठा ज्वालामुखी पाहण्याचा , चहा-कॉफीच्या मळ्यांतून भटकंती करण्याचा आनंदच निराळा ! याव्यतिरिक्त येथील संपन्न वन्यजीवन पाहणं म्हणजे सोन्याहून पिवळं ! इथे सोनेरी माकडं ( golden monkeys ), धोक्यात असलेली माउंटन गोरीलाची प्रजात व असंख्य नानाविध प्रजातींचे प्राणीपक्षी पाहायला मिळतात. त्याचप्रमाणे भव्य किवू तलावाजवळील आलिशान रिसॉर्टसमध्ये मिळणाऱ्या सुविधा तुमच्या या सफरीला ‘चार चाँद’ लावतात.😎 याची विस्तृत माहिती आपण पुढील लेखांत घेणार आहोत .

 

 

 

रुवांडामध्ये असताना काय-काय करता येईल ? ( Activities in Rwanda )

 

Photo Belongs to Google Search
Birds Of Rwanda

१. पक्षीनिरीक्षण ( Birdwatching )
निसर्गाने मुक्तहस्ते रंगांची उधळण केल्यामुळे इथे अनेक नानाविध प्रकारचे पक्षी वास्तव्यास आहेत. संपूर्ण आफ्रिकेतील १/३ पक्ष्यांच्या प्रजाती इथे आढळतात. जवळजवळ ७०० पेक्षा अधिक रंगांचे-आकारांचे पक्षी इथे आहेत. म्हणजे पक्षीनिरीक्षकांसाठी तर खजिनाच जणू ! व्होलकॅनोज नॅशनल पार्क (Volcanoes National Park) , आकागेरा नॅशनल पार्क (Akagera National Park) , न्युऑँग्वे नॅशनल पार्क (Nyungwe National Park) , रुगेझि स्वॉम्प (Rugezi Swamp), आकान्यारु (Akanyaru), न्याबारोंगो(Nyabarongo) आणि स्यामुडोंगो (Cyamudongo) या सात ठिकाणी पक्षीप्रेमींना ‘याचि देही याचि डोळा’ पक्ष्यांच्या हालचाली टिपता येतील.


 

 

Kayaking on Lake kivu

२. हायकिंग, ट्रेकिंग आणि कायाकिंग ( Hiking, Trekking and Kayaking)
रुवांडाचे नामकरणच “हजारो टेकड्यांचा भूप्रदेश” असे झाल्यामुळे इथे हायकिंग आणि ट्रेकिंगला खूप वाव आहे. त्यामुळे बऱ्याचदा हौशी ट्रेकर्सचा मेळा जमल्यासारखे वाटते. गर्दीच्या काळात गोरिला परमिटची रंग वाढत असताना आपला नंबर कधी येईल माहित नसतं. अशा वेळी बरेचसे अनुभवी ट्रेकर्स व्होलकॅनोज नॅशनल पार्कमध्ये व्होलकॅनोज चढून जाणे पसंत करतात. त्याचप्रमाणे आफ्रिकेतील सगळ्यात मोठ्या न्युऑँग्वे नॅशनल पार्कमध्ये ‘वॉकिंग ट्रेल’चा आनंददायी अनुभव घेता येतो. किवू तलावाच्या बाजूने काँगो नाईल ट्रेलच्या दिशेने हायकिंग करण्याचा मनमुराद आनंद हायकर्सना लुटता येतो. तसेच किवू तलावातील कायाकिंगचा रोमांचक अनुभवही पर्यटकांना मोहवून टाकतो.

 

 

 

Photo Belongs to Google Search
Primate Trekking

३. प्रायमेट ट्रेकिंग (Primate Trekking)
रुवांडामध्ये पर्यटनासाठी येणाऱ्या प्रत्येकाला जास्त आकर्षण असते ते याचेच. प्रायमेट ट्रेकिंग म्हणजे सस्तन प्राण्यांचा मागोवा घेत त्यांच्या हालचालींचं निरीक्षण करणं. थोडक्यात त्यांच्यासोबत वेळ घालवणं ! इथे गूढ वाटणाऱ्या माऊंटन गोरीलाचा सामना करणं हाच एक चमत्कारिक अनुभव आहे. त्यासोबतच सोनेरी माकडं, चिंपांझीचं निरीक्षण यामध्ये पर्यटक काही काळ तरी प्राण्यांच्याच विश्वात हरवून जातो एवढं नक्की !

 

 

 

 

 

Photo Belongs Google search
Akagera National Park

४. सफारी (Wildlife Safari)
सध्या तरी फक्त आकागेरा नॅशनल पार्कमध्येच पर्यटकांना वाईल्डलाईफ सफारीचा अनुभव घेता येतो.

 

 

 

 

 

 

 

Ugali , Most Popular food of Rwanda

रुवांडाची खाद्यसंस्कृती (Food Culture in Rwanda)
शेती हा रुवांडन नागरिकांचा प्रमुख व्यवसाय असल्यामुळे प्रामुख्याने शेतात पिकलेल्या अन्नधान्याचाच समावेश त्यांच्या खाद्यपदार्थांत असतो. त्यामध्ये मुख्यतः केळी, कच्ची केळी, बटाटा, डाळी, रताळी, फरसबी व साबुदाणादायी झाडाचे मूळ (Cassava) यांचा समावेश असतो. तलावाजवळ राहणाऱ्या लोकांमध्ये टिलिपिया माशाचे कालवण व भाजलेला मासा प्रसिद्ध आहे. तसेच मका आणि पाणी घालून लापशीसारखी घट्ट बनवलेली उगळी (Ugali) तिथे लोकप्रिय आहे. याशिवाय कुस्करलेल्या साबुदाणादायी झाडाच्या पानांपासून बनवलेला इसोंबे (Isombe) वाळवलेल्या माशासोबत खाणेही प्रचलित आहे. दुधापासून बनवलेले इकिव्हुगुटो (Ikivuguto) हे पेय तिथे सर्वत्र प्यायले जाते. त्याचप्रमाणे पारंपारिक पद्धतीची उरुग्वा बियर व प्रायमस (Primus), मुझिग ( Mutzig) आणि ऍम्स्टेल (Amstel) बियरही सहज उपलब्ध होते.

इथे दुपारचे जेवण शक्यतो बुफे पद्धतीचे असते व त्याला मिलांज (melange) असे म्हटले जाते. त्यामध्ये वरील पदार्थ आणि शक्यतो मांसाहाराचा समावेश असतो. जर संध्याकाळच्या वेळी बाहेर जेवत असाल तर ब्रोशेट (Brochette) हा सर्वात लोकप्रिय पदार्थ नक्की चाखून बघा. सामान्यतः तो बकऱ्याच्या मांसापासून बनवला जातो, पण कधीकधी बैल, डुक्कर व माशापासूनही बनवला जातो आणि भाजलेल्या केळ्यासोबत सर्व्ह केला जातो.
त्यांच्या पारंपारिक पदार्थांसोबतच रुवांडामध्ये इटालियन, अमेरिकन, भारतीय व इतर आंतरराष्ट्रीय पाककृतीही चाखायला मिळतात, पण असे पदार्थ पुरवणारी हॉटेल्स मर्यादित आहेत. त्यापैकी हेव्हन रेस्टॉरंट (Heaven Restaurant), ब्रॅशेटो (Brachetto), सोल एट लुना (Sol et Luna), कॅलाफिया (Calafia), शोकोला कॅफे (Shokola Cafe), नेहेमियाज बेस्ट कॉफी (Nehemiah’s Best Coffee) ही हॉटेल्स पर्यटकांमध्ये प्रसिद्ध आहेत. त्यांचे दरही अगदी आवाक्यात बसणारे आहेत. मेन कोर्स मेन्यूसाठी साधारणतः दिवसाला US$ ५ ते US$ १० खर्च येतो.

 

 

Facade of Hotel des Mille Collines

तिथे राहण्यासाठी कोणते पर्याय उपलब्ध आहेत ? (What are the staying options available ? )
रुवांडामध्ये बजेट हॉटेलपासून अगदी पंचतारांकित हॉटेल्सही उपलब्ध आहेत. स्वस्त, कमी दरातील हॉटेल्स हे नेहमी गजबजलेले असतात, तर चर्च-मिशन यांचे हॉटेल्स हे शांत आणि स्वच्छ असतात. याशिवाय कागाली, रुबाव्हु आणि राष्ट्रीय प्राणिसंग्रहालयांत टॉप-एन्ड हॉटेल्स, पर्यावरणपूरक लॉजेस (Ecolodges) व अपार्टमेंट्सही उपलब्ध आहेत. त्यांपैकी र्विझा व्हिलेज (Rwiza Village), फाईव्ह व्होलकॅनोज बुटीक हॉटेल (Five Volcanoes Boutique Hotel), बायसेट लॉज (Bisate Lodge), विरुंगा लॉज (Virunga Lodge), कॉर्मोरन लॉज (Cormoran Lodge) व पाम गार्डन लॉज (Palm Garden Lodge) पर्यटकांमध्ये प्रसिद्ध आहेत. नाश्त्यासहित बाथरूम व डबल रूमची किंमत साधारणतः US$ ५० ते US$ १५० च्या दरम्यान आहे.

 

 

 

 

Night life in Rwanda

मनोरंजन आणि नाईटलाईफ (Entertainment and Nightlife)
रुवांडामध्ये मनोरंजनाचे विविध पर्याय उपलब्ध आहेत, पण ते बऱ्याचदा गटाने येणाऱ्या पर्यटकांसाठीच राखीव असतात. स्वतंत्र प्रवास करणाऱ्या पर्यटकांसाठी इथनोग्राफिक म्युझियम (Ethnographic Museum) चा पर्याय उपलब्ध आहे. त्याचप्रमाणे जेव्हा तुम्ही व्होलकॅनोज नॅशनल पार्कच्या मुख्यालयात प्रवेश करता, तेव्हा तिथे अंतोर (Intore) या पारंपारिक नृत्याने तुमचे स्वागत करण्यात येते.
तसं कोणीही रुवांडामध्ये पार्टीसाठी नक्कीच येत नाही हे खरं असलं , तरीही पर्यटकांच्या सोईसाठी इथल्या प्रत्येक हॉटेलमध्ये बार आहेत. तसेच कागाली, जिसेनी (Gisenyi) आणि हुये (Huye) या शहारांतदेखील पर्यटकांना मुबलक प्रमाणात पर्याय उपलब्ध आहेत.

 

 

 

 

Traditional Dancers Crew Welcoming the Bride During introduction wedding in Rwanda

संगीत आणि नृत्यशैली (Music and Dance)
नृत्य आणि संगीत रुवांडामध्ये साजऱ्या होणाऱ्या विविध सण-उत्सव, संमेलन, कथाकथन कार्यक्रम यांचा अविभाज्य भाग आहे. सगळ्यात प्रसिद्ध अंतोर (Intore) हा पारंपारिक नृत्यप्रकार तीन भागांत विभागला जातो – स्त्रियांचे बॅलेनृत्य, ड्रमवादन व पुरुषांचे हिरो नृत्य. रुवांडामध्ये आल्यावर नक्कीच पाहायला हवे.
संगीत तर पारंपारिक रीतीने तोंडी तयार करूनच गायले जाते. महत्त्वाची भूमिका बजावतात ते ड्रम्स. त्यामुळे उत्कृष्ट ड्रमवादकांना तिथे खूप।चांगल्या दर्जाची वागणूक मिळते. ते ७ किंवा ९ जणांच्या गटाने सादरीकरण करतात.

 

 

 

 

 

ubumuntu arts festival kigali

रुवांडामधील स्थानिक कार्यक्रम (Local events in Rwanda)
देशामध्ये झपाट्याने होणाऱ्या औद्योगिक क्रांतीमुळे निरनिराळ्या जागतिक दर्जाच्या परिषदांचे आयोजन तर इथे होत आहेच, पण त्याचसोबत विविध कारणांनी येणाऱ्या पर्यटकांच्या मनोरंजनासाठी स्थानिक कार्यक्रमांचेही आयोजन केले जाते. त्यातील एक म्हणजे क्विटा इझिना (Kwita Izina). या समारंभात देशविदेशातील पाहुणे प्राचीन रुवांडन प्रथेप्रमाणे नव्याने जन्मलेल्या बेबी गोरीलांचे नामकरण करतात. तसेच फंड रेझिंग गाला डिनर, पर्यटन व संवर्धन प्रदर्शन आणि पर्यटनाशी निगडीत उपक्रमांनी हा कार्यक्रम खचाखच भरलेला असतो. याची अधिक माहिती या अधिकृत वेबसाईटवर उपलब्ध आहे. कागाली अप (KigaliUp) हा सांस्कृतिक फेस्टिव्हल देशविदेशातील संगीत, नृत्य व कलेची देवाणघेवाण करण्यात महत्त्वाची भूमिका बजावतो. याची अधिक माहिती वर उपलब्ध आहे. त्याचसोबत कागाली पीस मॅरेथॉन ( Kigali Peace Marathon), रुवांडा फिल्म फेस्टिव्हल (Rwanda Film Festival) व उबुमुंंटु आर्ट्स फेस्टिव्हल (Ubumuntu Arts Festival) अशा स्थानिक कार्यक्रमांचेही आयोजन केले जाते. त्यामुळे टूरला जाताना जर यापैकी कोणत्याही कार्यक्रमाचा योग जुळून आला तर नक्की अनुभव घ्या.

 

 

Antiques of Rwanda

इथे खरेदी काय करायची ? (Shopping Speciality of Rwanda)
रुवांडा आपल्या आकर्षक हस्तकलेसाठी प्रसिद्ध आहे. बारीक विणकाम केलेली बास्केट्स, (न्यिरामाबुनो i.e. Nyiramabuno), निमुळत्या तोंडाच्या बाटल्या (इयान्सी i.e. iayansi), बटिक, वादनाचे ड्रम्स, आणि एकमेव इमिगोंगो (imigongo) चित्रकला (शेण्या व विविध रंगांची नैसर्गिक माती एकत्र करून भौमितिक आकार काढून रंगवण्याची कला) रुवांडामध्ये प्रसिद्ध आहे. त्यामुळे यांपैकी विविध वस्तू तुम्ही नातलगांना देण्यासाठी व एक आठवण म्हणून स्वतःसाठीही घेऊ शकता.


 

 

 

 

Photo Belongs to Google Search
Kigali City Centre of Rwanda

 

रुवांडामध्ये असताना कोणते शिष्टाचार पाळायला पाहिजेत ? (Etiquettes to be followed)
‘रुवांडा’ नेहमीच स्वागतार्ह देश राहिला आहे, पण तिथे जाण्यापूर्वी त्यांचे शिष्टाचार समजून घेतले तर प्रवास आणखी सुखकर होईल.
१. इथे कोणत्याही गोष्टीसाठी घाई नसते. त्यामुळे नवख्या गोष्टी पाहून अधीर होण्यापेक्षा त्या छान समजून घ्या. तरच तुम्हाला ते आपलंसं वाटेल.
२. जर candid फोटो घेत नसाल, तर ज्या व्यक्तीचा फोटो काढायचा आहे, तिची आधी परवानगी घ्या. त्यांनी परवानगी नाही दिली तर जबरदस्ती किंवा आग्रह करू नका.
३. सामान्यतः रुवांडन नागरिक हे विनम्र असतात, पण पहिल्या भेटीत ते बऱ्यापैकी औपचारिक वागतात. त्यामुळे संभाषणाला सुरुवात करण्यापूर्वी फ्रेंच पद्धतीने हात मिळवून अभिवादन करणे इथे प्रचलित आहे. तसे इथले नागरिक युगांडाच्या नागरिकांपेक्षा जास्त मनमिळावू, प्रेमळ आणि बिनधास्त आहेत. आपल्या देशाला भेट देणाऱ्या पर्यटकांविषयी त्यांना कुतूहल व प्रेम आहे. त्यामुळे देशात कुठेही फिरताना तुम्हाला सन्मानाचीच वागणूक मिळेल.
४. इथल्या नागरिकांना त्यांच्या जातीजमातीविषयी विचारणे अनुचित समजले जाते, कारण वेगवेगळ्या जातींची ‘पुराणातली वांगी पुराणात’ ठेवून एक रुवांडाचा नागरिक म्हणून स्वतःची ओळख सांगणे त्यांना रास्त वाटते. त्यामुळे त्याविषयी विचारण्यापेक्षा त्यांना त्यांच्या देशाविषयी विचारा. नक्कीच सकारात्मक दृष्टीने संभाषण सुरू राहील.
फक्त हे नियम लक्षात ठेवा कि तुमची ट्रिप छान पूर्ण झालीच म्हणून समजा.

 

 

 

Rwanda Visa

रुवांडासाठी व्हिसा कसा मिळेल ?
कोणत्याही देशात जाण्याआधी तिथला व्हिसा मिळणं महत्त्वाचं असतं. पण तेच सगळ्यात जिकिरीचं काम आहे. भारतीयांना रुवांडामध्ये पर्यटनासाठी कसा व्हिसा मिळवावा याची आवश्यक माहिती या लिंक मध्ये दिली आहे.
आता फक्त थोडक्यात आपण कोणाला कोणता व्हिसा दिला जातो याची माहिती घेऊ. T1 व्हिसा काही निवडक देशाच्या नागरिकांना दिला जातो. भारतीयांसाठी T2 व्हिसाची तरतूद आहे. T3 व्हिसा अशा नागरिकांना दिला जातो ज्यांचे जवळचे नातलग कामानिमित्त रुवांडामध्ये स्थायिक झाले आहेत. T4 Official Diplomat व्हिसा देशातील मोठ्या अधिकाऱ्यांसाठी असतो. T5
Job search व्हिसा अशा कुशल कामगारांसाठी असतो ज्यांच्या व्यवसायाला / कामाला खूप मागणी आहे व ते उत्तम संधीच्या शोधात आहेत. T6 conference व्हिसा हा अधिवेशन किंवा सभेनिमित्त तर T7 Business व्हिसा हा व्यवसायानिमित्त रुवांडामध्ये येणाऱ्यांसाठी असतो. T8 Medical treatment व्हिसा औषधोपचारासाठी रुवांडामध्ये तात्पुरते स्थलांतर करणाऱ्यांना दिला जातो. T10 Itinerant Business Person व्हिसा नियमित कामानिमित्त रुवांडामध्ये प्रवास करणाऱ्या व्यक्तीला दिला जातो. T11 Briging व्हिसा हा अपवादात्मक परिस्थितीमध्ये दिला जातो. याचा उद्देश त्या व्यक्तीला तात्पुरते रुवांडामध्ये राहता यावे व त्याला तिथून स्वतःच्या देशात जाण्यासाठी मदत व्हावी एवढाच असतो. T12 East Africa Tourist व्हिसा हा केनिया, रुवांडा आणि युगांडा या तीन देशांना सलग भेट देणाऱ्या पर्यटकांना दिला जातो.

 

चला, देशाची तोंडओळख झाली. व्हिसाची इत्यंभूत माहिती देखील मिळाली. आता वेळ आली आहे बॅगपॅक करून प्रत्यक्ष रुवांडामध्ये आपलं विमान                                                                                       उतरवण्याची. तर आपण उतरतोय ‘रुवांडाची राजधानी आणि आफ्रिकेतील महत्त्वाचे व्यावसायिक केंद्र” अशी ओळख असलेल्या कागालीमध्ये . लवकर                                                                              मस्त फ्रेश होऊन या. मग आपण निघू कागालीच्या नयनरम्य सफरीवर. तोपर्यंत bye✋!!!!!

12 thoughts on “हजारो टेकड्यांचा भूप्रदेश : रुवांडा ( Land of Thousand Hills : Rwanda )

 1. I am actually pleased to read this webpage posts which contains lots of helpful information, thanks for
  providing such information.
  +905323495077

 2. I will immesiately snatch your rsss feed as I can not find
  your e-mail subscription link or e-newsletter service. Do you
  hve any? Please permit me know in order that I could subscribe.
  Thanks.

  1. Dear Concern ,

   You Can Find Email Subscription box in the footer area
   Please let us know i you require any further details
   Thank you for Visiting

   Regards
   T.W.D.

 3. Rüyada siyah yılan öldürmek; Yahu sen ne şanslı bir insansın? Çünkü eğer rüyanda siyah bir yılan öldürdüysen, bir düşmanın var ve çok uyanık biri, hatta sana zarar vermek için elindeki tüm imkanları seferber ediyor fakat yine de sana tek bir
  zarar veremeyecek diye tabir edilir. Bu düşmana karşı kendini
  korumak amacıyla özel bir çaba harcamana gerek
  bile yok, farkında olmadan attığın adımlar yeterli gelecek.

  Yani kaderine güvenerek bu tehlikeli düşmanın üstesinden geleceksin.

 4. Fascinating blog! Is your theme custom made or did you download it from somewhere?
  A design like yours with a few simple adjustements would really make my blog stand out.
  Please let me know where you got your design. Kudos

  1. Dear Concern ,

   It’s WordPress theme , you can download it from wordpress

   Thank you for Visiting , stay tuned with us & share our blog if you like it

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *