Spread the love

 नवरा-नवरी पर्वतरांगांनी वेढलेल्या चंदेरी किल्ल्याजवळील धनगर धबधबा! नावं थोडी वेगळी व कुतूहल जागवणारी आहेत ना! आपल्या भटकंती वर्षाऋतूतली सीरिज मधील आणखी एक ऑफबीट ठिकाण म्हणजे बदलापूरमधील हा धनगर धबधबा. 

धनगर धबधब्यावरील रॅपलिंग

पावसाळ्यात उंचावरून पडणाऱ्या पाण्याचे तुषार अंगावर घेत रॅपलिंगचा थरार अनुभवायचा असेल, तर ‘धनगर धबधबा’ एक मस्त पर्याय आहे. शिवाय मुंबई पासून १.३० ते २ तासांच्या अंतरावर असल्यामुळे ‘बेस्ट वन डे पिकनिक स्पॉट’ ही म्हणता येईल. जवळजवळ ७५ फूटांवरून धबधब्याचे पाणी खाली कोसळते. इथे धबधबा हे मुख्य आकर्षण असले तरी आजूबाजूचा परिसरही नयनरम्य आहे.

धनगर धबधब्यानजीकचा परिसर

विविध ट्रेकर्सचे ग्रुप इथे फ्लाईंग फॉक्स,रॅपलिंग सारख्या साहसी खेळांचा अनुभव घेण्यासाठी येतात.बेस व्हिलेज पासून धबधब्यापर्यंत जाण्यासाठी अर्धा ते पाऊण तास लागतो. खाली गावात चहा – नाश्त्याची सोय करता येते, पण तरीही स्वतःसोबत ‘रेडी टू इट’खाण्याचे पदार्थ व कमीत कमी दोन लिटर पाणी घेणे आवश्यक आहे. त्याचसोबत ग्लुकॉन-डी, इलेक्टोरल चे एक पॅकेट ही घ्या. सकाळी लवकर प्रवासाला सुरुवात केली तर अगदी ९.३० – १०.०० दरम्यान धबधब्यावर पोहोचता येते व रात्री ९.०० पर्यंत मुंबई गाठता येते. त्यामुळे यंदाच्या पावसाळ्यात काही हटके करायचा विचार असेल तर नक्की धनगर धबधब्याला भेट द्या .

जायचे कसे ?

१.बदलापूर रेल्वे स्थानकापासून धनगर धबधबा ८ किमी अंतरावर आहे.मुंबई ते बदलापूर रेल्वेने जाऊन पुढे स्थानिक बसेस किंवा रिक्षा ने गावापर्यंत जाता येते.तिथे चेंजिंग रूम व नाश्त्याची सोय आहे.पुढे पायी जाऊन धबधबा गाठावा लागतो.
२.सकाळी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसहून ६.१० ची कर्जत फास्ट ट्रेन आहे. ती ७.३० पर्यंत बदलापूर स्थानकात पोहोचते .
३.खाजगी वाहनाने थेट धनगर धबधब्याच्या गावापर्यंत जाता येते.

धनगर धबधब्यावर साहसी खेळांचा थरार

Photos: Google.com

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *