३. देवकुंड धबधबा (मान्सून special आर्टिकल)

More to Explore भटकंती वर्षाऋतूतली!
Spread the love

३. देवकुंड धबधबा (मान्सून special आर्टिकल)

माणगावातील भिरा धरणाजवळ ‘भिरा’ नावाचंच एक छोटंसं गाव आहे. त्या गावाजवळील जंगलात देवकुंड धबधबा आहे. त्याला व्हर्जिन वॉटरफॉल (virgin waterfall) असं देखील म्हणतात. माणसांच्या वर्दळीपासून आणि अस्वच्छतेपासून टिकून त्याने आपलं सौंदर्य जपलंय, म्हणून त्याला व्हर्जिन वॉटरफॉल म्हणत असतील का ? जाऊन पाहिलं तर !

या देवकुंड धबधब्याचे आणखी वैशिष्ट्य म्हणजे इथे तीन धबधब्यांचा संगम असून नितळ स्वच्छ पाण्याचा डोह आहे. तसेच रिव्हर राफ्टिंगसाठी प्रसिद्ध असलेल्या कुंडलिका नदीचा उगमही इथेच होतो. बेस व्हिलेज पासून देवकुंड धबधब्यापर्यंत जाण्यासाठी दोन तासांचा रस्ता आहे. जाताना स्वतःसोबत रेडी तो इट खाऊ व पाण्याच्या बाटल्या घेऊन जाणे योग्य ठरेल. तसेच पायात सध्या सँडलपेक्षा ट्रेकिंग शूज असतील तर चालताना त्रास होणार नाही. आणखी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे प्रवास सकाळी लवकर सुरू केला तर जास्त बरे, कारण भिरा गावापासून देवकुंड धबधब्यापर्यंत जाण्यासाठी २ तास लागतात व परतण्यासाठी किमान दीड तास तरी लागतो. त्यामुळे वेळेचे गणित मांडून प्रवासाचे नियोजन करा. तसेच पाण्यात मर्यादेपेक्षा जास्त पुढे जाऊ नका. पावसाळ्यात रस्ता चुकण्याची दाट शक्यता असते. त्यामुळे स्थानिक गाईड (वाटाड्या) सोबत घेणे अनिवार्य आहे.

जायचे कसे ?
१. मुंबई ते देवकुंड धबधबा
• खाजगी वाहन : कर्जत – खोपोली – पाली – भिरा ( टाटा हायड्रो पॉवर प्लांट )
• सार्वजनिक वाहतूक : सीएसटी ते खोपोली (ट्रेन) – खोपोली ते पाली (बस) – पाली ते भिरा (बस किंवा रिक्षा)
२. पुणे ते देवकुंड धबधबा
• खाजगी वाहन : स्वारगेट – कात्रज – ताम्हिणीघाट – पाटनस – भिरा (टाटा हायड्रो पॉवर प्लांट )
• सार्वजनिक वाहतूक : पुणे ते कर्जत (ट्रेन) – कर्जत ते खोपोली (ट्रेन) – खोपोली ते पाली (बस) – पाली ते भिरा (बस किंवा रिक्षा)देवकुंड धबधबा
देवकुंड धबधबा उगम
देवकुंड धबधबा उगम

Written by Pooja Jadhav & Published by T.W.D.
Also Follow us on below for regular stories and blogsLeave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *