Spread the love

नितळ स्वच्छ पाण्याची नदी : उमंग्ट

मित्रांनो, नितळ स्वच्छ पाणी ज्याला आपण इंग्रजीमध्ये crystal clear water असेदेखील म्हणतो ते भारतात पाहायला मिळेल का? 🤔 जिथे आपणच अर्धीअधिक समुद्रसंपत्ती अस्वच्छ करतोय तिथे इतकं स्वच्छ पाणी पाहण्याची कल्पनाही वेडेपणाची ठरेल, नाही का? पण भारतात अशी एक जागा आहे, जिच्याबद्दल खूप कमी लोकांना माहित आहे आणि आपण आज तिचाच शोध घेणार आहोत.

ती आहे भारतातील सर्वात स्वच्छ नदी 'उमंग्ट' ! भारताच्या ईशान्येकडील टोकाला मेघालय वसले आहे. याच मेघालयातील डावकी (Dawki) गावातून ही नदी वाहते. मेघालयाची राजधानी शिलॉंगपासून ९५ किलोमीटर अंतरावर हे गाव आहे. अगदी आडबाजूला असल्यामुळे हे ठिकाण आतापर्यंत जास्त कोणाच्याही परिचयाचं नव्हतं. असं असलं तरीही ते भारत व बांग्लादेश मधील व्यापाराचं महत्त्वाचं ठिकाण आहे आणि इथून वाहणारी उमंग्ट नदी ही मच्छीमारीचा प्रमुख स्रोत आहे. ही नदी भारत व बांग्लादेशमधील नैसर्गिक सीमा आहे. त्यामुळे बांगलादेशमध्ये जाण्यासाठी हा एक जलमार्ग आहे. दोन्ही देशांतील मच्छीमारांचा या ठिकाणी वावर असतो. त्यामुळे त्यांच्यात यदाकदाचित संभाषण झाले तर कसे होत असेल?🤔

बांग्लादेशी : हॅलो मित्रा ! या सगळ्या मासळ्या सीमा पार करून तुझ्याकडेच येतायत. मला पण पाहिजेत थोड्या विकायला, नाहीतर उपाशी राहावं लागेल.😪 येऊ का तिथे? फक्त दोनच मिनिटं ! तेवढ्या वेळात मिळतील तितक्याच घेऊन परत जाईन बांग्लादेशात, पण आता येऊ का भारतात ?

भारतीय : असं म्हणतोस...🤔 ये पण फक्त दोनच मिनिटं. नंतर गुमानं परत जायचं. आमची संस्कृती आहेच तशी.. मच्छीमार देवो भव:.... Sorry sorry अतिथी देवो भव:, पण सारखं येऊ नको एका मिनिटात देश बदलता येतोय म्हणून. नाहीतर वाटंल, "आवो जावो घर तुम्हारा, सब मासळ्या भी तुम्हाऱ्या नि हूक फक्त हमारा".
हा झाला विनोदाचा भाग, पण अशी परवानगीशिवाय देशाची सीमा ओलांडता येत नाही.

 

उमंग्ट नदीचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे तिचे पाणी इतके नितळ आणि स्वच्छ आहे की बोट पाण्यावर नव्हे तर हवेत तरंगतेय का असा भास होतो. त्यामुळे हे निसर्गाचं अनोखं रूप पाहण्यासाठी एकदातरी उमंग्ट नदीला भेट द्यायलाच हवी.

Photo Source 

Please Comment below to share your feedback

Follow T.W.D. on Facebook , Instagram , Google Plus & Twitter for more travel stories & explore the known india

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *