अद्भुत संग्रहालय

"संग्रहालय म्हणजे काय असणार ? पुरातनकाळातील किंवा जुन्या गोष्टी जतन करून ठेवल्या असतील. तिथे गेल्यावर त्यांची माहिती मिळणार एवढंच!" बऱ्याचदा असा आपला कल असतो. पण बदलत्या काळानुसार संग्रहालयांची व्याख्याही बदलतेय आणि नव्या रुपात ती प्रेक्षकांसमोर येतेय. त्यातील नाविन्य टिपण्याचा आणि तो आपल्या वाचकांसमोर मांडण्याचा एक प्रयत्न म्हणजे "अद्भुत संग्रहालय" हे सदर. इथे आपण देशविदेशातील अद्भुत आणि नाविन्यपूर्ण संग्रहालयांची माहिती तर घेणार आहोतच पण त्याचसोबत जगविख्यात संग्रहालयांबद्दल ही जाणून घेऊ. तुम्हालाही असे एखादे जगावेगळे संग्रहालय माहीत असेल किंवा कोणत्या संग्रहालयाची माहिती पाहिजे असेल तर कमेंटबॉक्स मध्ये नक्की कळवा. आम्ही त्याची लवकरात लवकर दखल घेऊन त्याविषयी माहिती उपलब्ध करून देऊ. त्याचसोबत तुमचा थोडा वेळ देऊन हे लेख वाचताना मजा येतेय का किंवा त्यामध्ये अजून काय बदल करायला पाहिजेत हे सुद्धा सांगायला विसरू नका. त्यामुळे आम्हाला तुमच्यासोबत जास्तीत जास्त कनेक्ट होता येईल.😊

  • India,  More to Explore,  अद्भुत संग्रहालय,  शोध अज्ञाताचा.....

    दगडाचा बगीचा (Rock Garden, Chandigarh)

    दगडाचा बगीचा (Rock Garden, Chandigarh) राक्षस आणि पिंजऱ्यातला पोपट “एका अजस्त्र राक्षसाचा जीव किल्ल्यावरील उंच टोकाला टांगलेल्या पिंजऱ्यातील पोपटात असतो. जो त्या पोपटाला मारेल त्याला किल्ल्याचा ताबा तर मिळेलच पण राक्षसाने दडवून ठेवलेला खजिनाही मिळेल. अनेक तरुण श्रीमंत होण्याच्या लालसेपोटी आपले नशीब आजमवायला जातात आणि राक्षस जादूने त्यांचे दगडी पुतळ्यात रूपांतर करतो…..” आता तुम्ही म्हणाल हा ट्रॅव्हल ब्लॉग आहे आणि ही गोष्टी का सांगतेय? तेही सांगते… ट्रॅव्हल चॅनेल वर ‘रॉक गार्डन’ पाहिलं आणि लहानपणी गोष्टीच्या पुस्तकात वाचलेली ही ‘राक्षस आणि पिंजऱ्यातल्या पोपटाची गोष्ट’ आठवली. जसं गोष्टीतल्या किल्ल्यात प्रवेश केल्यावर प्रथम वेगवेगळ्या स्थितीतील दगडी पुतळे नजरेस पडतात, अगदी तसंच इथेही! वाटलं ही पण जादूच असेल तर? कोण्या मोठ्या जादूगाराने जिवंत माणसांचे…

  • India,  More to Explore,  अद्भुत संग्रहालय,  शोध अज्ञाताचा.....

    शौचालय …… एक संग्रहालय

    शौचालय …… एक संग्रहालय Entrance of Museum सुलभ आंतरराष्ट्रीय शौचालय संग्रहालय, नवी दिल्ली ( Sulabh International Museum of Toilets, New Delhi) ‘टॉयलेट : एक प्रेमकथा’ पाहताना मनात एकच विचार खूप वेळ घर करून होता. “शौचालयांची नितांत गरज दाखवण्यासाठी त्यावर एक संपूर्ण चित्रपट तयार करावा लागला. तरीही अनेक गावं आणि दुर्गम भाग या मूलभूत सुविधेपासून वंचित आहेत.” चित्रपटगृहातून घरी येतानाही हाच विचार कितीतरी वेळ मनात घोळत होता.सहज टाईमपास म्हणून गुगलवर सर्फिंग सुरू केलं आणि दिसलं ’10 Weirdest Museums in the World’ ….. उत्सुकतेपोटी क्लिक केलं आणि आणि त्यात आपल्या देशातलं हे “शौचालय संग्रहालय” गावलं. आज फक्त टॉयलेट्स बघायचे दिवसभर असंच वाटलं. आधी प्रेमकथा, नंतर संग्रहालय…😂 Precious toilet ## Toilet museum overall…

Enjoy this blog? Please spread the word :)

RSS
EMAIL
Facebook
Facebook
Google+
Google+
http://travelwithdreams.com/category/more-to-explore/%E0%A4%85%E0%A4%A6%E0%A5%8D%E0%A4%AD%E0%A5%81%E0%A4%A4-%E0%A4%B8%E0%A4%82%E0%A4%97%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%B2%E0%A4%AF
Instagram