• More to Explore,  शोध अज्ञाताचा.....

  गुलाबी तलाव : लेक हिलियर (Lake Hillier)

  आजपर्यंत गुलाबी प्रेम, गुलाबी आँखेंं यांबद्दल ऐकलं होतं. आता गुलाबी तलावही यांच्या यादीत समाविष्ट झाला! हा सुद्धा निसर्गानेच निर्माण केलेला एक चमत्कार : लेक हिलियर. ऑस्ट्रेलियातील रिशर्श आर्किपेलागो (Recherche Archipelago) बेटावरील हा गुलाबी तलाव म्हणजे गुलाबी रंगाचा बबलगमच जणू! एका बाजूला अथांग पसरलेला निळाशार समुद्र , मध्ये दाट झाडी आणि दुसऱ्या बाजूला हा गुलाबी तलाव म्हणजेच लेक हिलियर. या तलावाचे वैशिष्ट्य म्हणजे वर्षभर त्याचे पाणी गुलाबी रंगाचेच असते. तुम्ही थोडे पाणी अगदी तुमच्याकडच्या बाटलीत भरून पाहिले तरी त्याचा रंग काही बदलणार नाही. प्रश्न पडला असेल ना , कसं शक्य आहे म्हणून! म्हणतात ना देवाची करणी अन् नारळात पाणी ! तसंच काहीसं या तलावाचं. वैज्ञानिकांच्या म्हणण्याप्रमाणे तो एक क्षारयुक्त तलाव आहे.…

 • India,  More to Explore

  ६. झेनिथ धबधबा ( Zenith Waterfall )

  आपल्या सौंदर्याची मोहिनी टाकत दरवर्षी अधिकाधिक पर्यटकांचा ओढा खेचून आणणारा धबधबा म्हणजे खोपोलोतील ‘झेनिथ धबधबा’. रायगड जिल्ह्यातील प्रसिद्ध धबधबा अशी त्याची ख्याती आहे . जवळजवळ ८० ते ९० फुटांवरून कोसळणारा हा धबधबा मुंबई व पुणे दोन्ही शहरांपासून जवळ आहे. झेनिथ धबधबा मोठा व वक्राकार आहे. इथे ट्रेकिंग, रॅपलिंगसाठी उत्तम संधी असल्यामुळे अनेक साहसप्रेमी पावसाळ्यात त्याचा आनंद लुटण्यासाठी येतात. मुख्य धबधब्यापासून काही अंतरावर आणखी लहान – मोठे धबधबेही आहेत. त्यामुळे एकांताच्या शोधात असणाऱ्यांनी ती वाट धरायला हरकत नाही. तसेच इथे जवळच दत्ताचे मंदिरदेखील आहे. झेनिथ धबधब्याकडे जाणारा रस्ताही तसा चढ-उतारांचा आहे, पण गटाने जाताना मज्जा येईल. तिथे पोहोचण्याआधी तुम्हांला भातशेतातून व पाण्याच्या लहानमोठ्या झऱ्यांतून जावे लागेल. वाटेत दोन झरे लागतात व…

 • India,  More to Explore

  ५. धनगर धबधबा (Dhangar waterfall)

   नवरा-नवरी पर्वतरांगांनी वेढलेल्या चंदेरी किल्ल्याजवळील धनगर धबधबा! नावं थोडी वेगळी व कुतूहल जागवणारी आहेत ना! आपल्या भटकंती वर्षाऋतूतली सीरिज मधील आणखी एक ऑफबीट ठिकाण म्हणजे बदलापूरमधील हा धनगर धबधबा.  पावसाळ्यात उंचावरून पडणाऱ्या पाण्याचे तुषार अंगावर घेत रॅपलिंगचा थरार अनुभवायचा असेल, तर ‘धनगर धबधबा’ एक मस्त पर्याय आहे. शिवाय मुंबई पासून १.३० ते २ तासांच्या अंतरावर असल्यामुळे ‘बेस्ट वन डे पिकनिक स्पॉट’ ही म्हणता येईल. जवळजवळ ७५ फूटांवरून धबधब्याचे पाणी खाली कोसळते. इथे धबधबा हे मुख्य आकर्षण असले तरी आजूबाजूचा परिसरही नयनरम्य आहे. विविध ट्रेकर्सचे ग्रुप इथे फ्लाईंग फॉक्स,रॅपलिंग सारख्या साहसी खेळांचा अनुभव घेण्यासाठी येतात.बेस व्हिलेज पासून धबधब्यापर्यंत जाण्यासाठी अर्धा ते पाऊण तास लागतो. खाली गावात चहा – नाश्त्याची सोय करता येते,…

 • India,  More to Explore

  ४. चिंचोटी धबधबा

  मुंबईपासून जवळच वसईतील घनदाट जंगलात हा धबधबा आहे. मान्सून पर्यटनासोबत ट्रेकिंग आणि साहसाची आवड असेल तर तुम्ही चिंचोटी धबधब्याचा पर्याय निवडायला हरकत नाही. प्रवास थोडा खडतर आणि शीण आणणारा असला तरी धबधब्याजवळ पोहोचल्यावर समोरचे नयनरम्य दृश्य पाहून तो थकवा दूर पळून जातो. पक्षीप्रेमी व फोटोग्राफर्ससाठी मुंबईच्या जवळचा हा निसर्ग म्हणजे स्वर्गच जणू ! पण या साहसी सफरीवर निघण्याआधी काही गोष्टी लक्षात ठेवणे खूप महत्त्वाचे आहे. धबधब्याकडे जाणारा रस्ता खडकाळ असल्यामुळे चांगल्या प्रतीचे फ्लोटर्स किंवा ट्रेकिंग शूज घातले तर चालताना त्रास होणार नाही. या जंगलातून जाताना चिंचोटी नदी पार करावी लागते. नदीचे पात्र खडकाळ व काही ठिकाणी खोल असल्यामुळे तोल जाऊन बुडण्याचीही शक्यता आहे. त्यामुळे सतर्क रहा. महत्त्वाचे म्हणजे एकट्याने जाण्यापेक्षा…

 • https://petapixel.com/2017/06/26/photographing-hang-son-doong-worlds-largest-cave/
  More to Explore,  शोध अज्ञाताचा.....

  जगातील सगळ्यात मोठी गुहा : . हांग सन डूंग (World’s Largest Cave : Hang Son Doong)

  जगातील सगळ्यात मोठी गुहा : . हांग सन डूंग (World’s Largest Cave : Hang Son Doong) निसर्गाचे आविष्कार हे नेहमीच आपल्यासाठी एक आश्चर्य राहिले आहेत. असाच एक अद्भुत आविष्कार म्हणजे व्हिएतनाममधील हांग सन डूंग गुहा. ही गुहा जगातील सगळ्यात मोठी गुहा तर आहेच, पण गुहेतील वातावरणही बाहेरील वातावरणापेक्षा पूर्णतः वेगळे आहे. अगदी तिचे स्वतःचे जंगल, विविध प्रकारची झाडं-झुडुपं, रों-रों आवाज। करत वाहणारी नदी, तलाव सगळंच हांग सन डूंगचं. एक स्वतंत्र अस्तित्व सिद्ध करतं. गुहेत प्रवेश करताक्षणी वाटावं की आपण एका नव्या, वेगळ्या दुनियेत पाऊल ठेवलंय! व्हिएतनामच्या जंगलात हांग सन डूंग स्थित आहे. १९९१ साली हो खान नामक स्थानिक व्यक्तीने या गुहेचा शोध लावला, पण गुहेतील दाट काळोख व आतून वाहणाऱ्या…

 • India,  More to Explore

  ३. देवकुंड धबधबा (मान्सून special आर्टिकल)

  ३. देवकुंड धबधबा (मान्सून special आर्टिकल) माणगावातील भिरा धरणाजवळ ‘भिरा’ नावाचंच एक छोटंसं गाव आहे. त्या गावाजवळील जंगलात देवकुंड धबधबा आहे. त्याला व्हर्जिन वॉटरफॉल (virgin waterfall) असं देखील म्हणतात. माणसांच्या वर्दळीपासून आणि अस्वच्छतेपासून टिकून त्याने आपलं सौंदर्य जपलंय, म्हणून त्याला व्हर्जिन वॉटरफॉल म्हणत असतील का ? जाऊन पाहिलं तर ! या देवकुंड धबधब्याचे आणखी वैशिष्ट्य म्हणजे इथे तीन धबधब्यांचा संगम असून नितळ स्वच्छ पाण्याचा डोह आहे. तसेच रिव्हर राफ्टिंगसाठी प्रसिद्ध असलेल्या कुंडलिका नदीचा उगमही इथेच होतो. बेस व्हिलेज पासून देवकुंड धबधब्यापर्यंत जाण्यासाठी दोन तासांचा रस्ता आहे. जाताना स्वतःसोबत रेडी तो इट खाऊ व पाण्याच्या बाटल्या घेऊन जाणे योग्य ठरेल. तसेच पायात सध्या सँडलपेक्षा ट्रेकिंग शूज असतील तर चालताना त्रास होणार…

 • India,  More to Explore

  चमकत्या ताऱ्यांचा दर्या : वाधू बेट ( Sea of Stars : Vaadhoo Island )

  चमकत्या ताऱ्यांचा दर्या : वाधू बेट ( Sea of Stars : Vaadhoo Island )   तुम्ही निळ्या जादुबद्दल काही ऐकलंय का ? खरंतर निसर्गानेच निर्माण केलीय ही जादू ! या जादूचा प्रत्यक्ष अनुभव घ्यायचा असेल तर तुम्हांलाही मालदीवच्या वाधू बेटावर यावं लागेल, ज्याला निळं जादुई बेट असं देखील म्हणतात. गोंधळलात ? निसर्गाचे आविष्कारच असे आहेत की ते कधीकधी बुचकळ्यात पाडतात. आता हेच बघा ना ! आकाशातले काही तारे समुद्रात पडले अन् निळ्या जादूचा उदय झाला. आता त्याच समुद्राला सगळे निळे जादुई बेट, Sea of Stars, Ocean of Stars म्हणू लागले. खरंच परीकथा वाटतेय ना !   रात्रीच्या वेळी मालदीवच्या वाधू बेटावर दिसणारा हा नजारा म्हणजे अप्रतिम ! रात्री या बेटावर…

 • India,  More to Explore

  २. शिवथरघळ (Shivtharghal)

  02 . शिवथरघळ   गीरीचे मस्तकी गंगा । तेथुनि चालिली बळे । धबाबा लोटती धारा । धबाबा तोय आदळे ॥ १ ॥ गर्जतो मेघ तो सिंधु । ध्वनि कल्लोळ उठीला । कड्यासी आदळे धारा । वात आवर्त होतसे ॥ २॥ तुशार उठती रेणु । दुसरे रज मातले । वात मिश्रीत ते रेणु । सीत मिश्रीत धुकटे ॥ ३॥ दराच तुटला मोठा । झाड खंडे परोपरी । निबीड दाटली छाया । त्यामधे वोघ वाहाती ॥ ४॥ गर्जती स्वापदे पक्षी । नाना स्वरे भयंकरे । गडद होतसे रात्री । ध्वनीकल्लोळ उठती ॥ ५॥ कर्दमु निवदेना तो । मनासी साकडे पडे । विशाळ लोटली धारा । ती खाली रम्य विवरे ॥ ६॥ कपाटे…

 • India,  More to Explore

  Magical Paradise : Mawlynnong

  Magical Paradise : Mawlynnong Mawlynnong…. Many of you must have skipped reading the word in it’s title only. Haha… now you are smiling because you did the same thing. So, the next destination of our “Discovering Undiscovered” series is the place “Mawlynnong”. And now you have to try reading the word because it will come often while reading this whole article. Name is quite difficult to pronounce but the village is clean, pretty and villagers are kind-hearted. First we will talk about the village. Around 90 km from Shillong ( Capital of Meghalaya), there is a magical paradise called Village Mawlynnong. Actually it’s a small village like other ordinary villages,…

 • India,  More to Explore

  Crystal Clear river of india ( नितळ स्वच्छ पाण्याची नदी : उमंग्ट )

  नितळ स्वच्छ पाण्याची नदी : उमंग्ट मित्रांनो, नितळ स्वच्छ पाणी ज्याला आपण इंग्रजीमध्ये crystal clear water असेदेखील म्हणतो ते भारतात पाहायला मिळेल का? जिथे आपणच अर्धीअधिक समुद्रसंपत्ती अस्वच्छ करतोय तिथे इतकं स्वच्छ पाणी पाहण्याची कल्पनाही वेडेपणाची ठरेल, नाही का? पण भारतात अशी एक जागा आहे, जिच्याबद्दल खूप कमी लोकांना माहित आहे आणि आपण आज तिचाच शोध घेणार आहोत. ती आहे भारतातील सर्वात स्वच्छ नदी ‘उमंग्ट‘ ! भारताच्या ईशान्येकडील टोकाला मेघालय वसले आहे. याच मेघालयातील डावकी (Dawki) गावातून ही नदी वाहते. मेघालयाची राजधानी शिलॉंगपासून ९५ किलोमीटर अंतरावर हे गाव आहे. अगदी आडबाजूला असल्यामुळे हे ठिकाण आतापर्यंत जास्त कोणाच्याही परिचयाचं नव्हतं. असं असलं तरीही ते भारत व बांग्लादेश मधील व्यापाराचं महत्त्वाचं ठिकाण…

Enjoy this blog? Please spread the word :)

RSS
EMAIL
Facebook
Facebook
Google+
Google+
http://travelwithdreams.com/2018/06
Instagram