India,  More to Explore

कलियुगात सापडलंय पृथ्वीवरचं अमृत…..!

कलियुगात सापडलंय पृथ्वीवरचं अमृत…..!

समुद्रमंथनातून निर्माण झालेल्या अमृताची गोष्ट तर आपण सगळ्यांनीच ऐकलीय. पण त्या अमृताची चव कुठे चाखली ना ! आता पृथ्वीवर कलियुगातल्या अमृताचा खजिना सापडलाय. तुम्हांलाही शोधायचाय? चला तर मग , जाऊया. पण लवकर जायला हवं हां, नाहीतर संपेल. मंडळी, हे अमृत थोडं वेगळं आहे बरं का ! म्हणजे ते कलशात नाही तर वनस्पतींच्या कळ्यांपासून तयार होतं आणि मुख्य म्हणजे निवडक लोकंच फक्त पौर्णिमेच्या रात्री याच्या कळ्यांना निवडतात आणि पहाटेच्या वेळीच त्याची पानं पॅक केली जातात, कारण सूर्यकिरणांमुळे त्याच्या शक्ती व सुगंधावर परिणाम होतो म्हणे ! स्थानिकांच्या म्हणण्यानुसार त्यामध्ये पृथ्वीवरील सगळी जादू , ब्रह्मांडामधील सगळी गुपितं आणि मातीतील सगळी शक्ती सामावलेली आहे.
     या अमृताची वैशिष्ट्य तर मी सांगितली , पण तुम्हांला आता ते कुठे आहे हा प्रश्न सतावतोय ना ! मग जायचं का दार्जिलिंगला ? अहो, तिथेच तर मिळतं हे पृथ्वीवरचं अमृत म्हणजेच रहस्यमय कथांनी भरलेला फक्कड असा सिल्व्हर टिप्स इम्पिरिअल चहा.
Google baba
     दार्जिलिंगपासून जवळजवळ ३३ किलोमीटर दक्षिणेकडे या चहाच्या बागायती आहेत. जगातील सगळ्यात पहिली चहाची लागवड केलेल्या ‘लक्ष्मी टी’ कंपनीकडे या चहाचे मालकी हक्क आहेत. त्यांच्याच मकाईबारी (Makaibari) बागांमध्ये हा चहा उगवला जातो, पण फक्त ५० ते १०० किलोंदरम्यानच ! हा चहा म्हणजे दुसऱ्या जगातील गोष्ट आहे असंच सगळे समजतात आणि अनेक रहस्य असल्यामुळे त्याची किंमतही तितकीच चकित करणारी आहे. त्याचा सुगंध जितका छान तितकाच त्याचा अंदाजही अनोखा ! त्याचं आणखी एक रहस्य म्हणजे तो अँटी – एजिंग असल्यामुळे पिणाऱ्याला कसं अगदी ‘सातवे आसमान पर’ असल्यासारखं वाटतं. म्हणूनच तर त्याला म्हणतात ‘ पृथ्वीवरच अमृत ‘!
Google Baba
     या चहाला जपान, ब्रिटन आणि अमेरिकेमध्ये जास्त मागणी आहे. २०१४ मध्ये तर हा सिल्व्हर टिप्स इम्पिरिअल चहा १ लाख ३६ हजार रुपये किलोंपेक्षा अधिक किंमतीने विकला गेला होता. दार्जिलिंगमध्ये उगवणाऱ्या या अमृततुल्य चहाला आतापर्यंत सर्वात जास्त किंमतीचा चहा म्हणून ओळखल जातं.
मग तुम्ही कधी या अमृताची चव चाखताय??

नमस्कार मंडळी, मी पूजा.... पूजा नरेश जाधव. आपल्या ट्रॅव्हल विथ ड्रीम्स या ब्लॉगच्या माध्यमातून नवनवीन पर्यटनस्थळांची माहिती तुमच्यासमोर आणतेय. गेल्याच वर्षी तोलानी वाणिज्य महाविद्यालयातून B. Com चं शिक्षण पूर्ण केलं. सध्या स्पर्धा परीक्षांची तयारी करतेय. त्यातून वेळ मिळाला की सरळ मोर्चा वळतो तो आपलं सगळ्यात आवडतं काम करायला ! हेच आपल्या ब्लॉगसाठी नवीन पोस्ट बनवण्याकडे.... यासोबत मला नवनवीन पदार्थ बनवायला आणि खायलाही खूप आवडतात. माझा दुसरा आवडता छंद म्हणजे झाडं लावणे आणि त्यांना न्याहाळत बसणे. अधूनमधून पुस्तकंही वाचते. त्यामध्ये परीकथा, साहसकथा आणि प्रवासवर्णनं वाचण्याकडे माझा जास्त कल असतो. या सगळ्यासोबत कॉलेजमध्ये असताना ज्यूडोचं प्रशिक्षणही घेतलं. नंतर पदवीच्या शेवटच्या वर्षाला असताना महाराष्ट्र टाइम्ससोबत "कॉलेज क्लब रिपोर्टर" म्हणूनही कामाचा अनुभव घेतला. या सगळ्या उद्योगांव्यतिरिक्त मला मनसोक्त भटकंती करायला आणि त्या त्या ठिकाणचे पारंपारिक पदार्थ चाखायलाही खूप आवडतं. तिथली संस्कृती अनुभवणं, लोकांच्या लहानसहान गोष्टींचं निरीक्षण करणं यात वेगळीच मजा येते. तशी स्वप्नं बरीच आहेत, पण त्यातलं एक म्हणजे आपला हा ब्लॉग यशस्वी करायचा. तुम्ही सगळे या प्रवासात आमच्यासोबत आहात, त्यामुळे काळजीचं काही कारणच नाही. ...... खूप बोलले ना. आता थोडं थांबते. तसे आपण भेटत राहूच नवीन पोस्टसोबत. तुम्हांला पोस्ट आवडली का हे जरूर कळवा हं. वाट बघतेय तुमच्या प्रतिक्रियेची.

2 Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Enjoy this blog? Please spread the word :)

RSS
EMAIL
Facebook
Facebook
Google+
Google+
http://travelwithdreams.com/%E0%A4%A4%E0%A5%81%E0%A4%AE%E0%A5%8D%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%B2%E0%A4%BE-%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%AF-%E0%A4%AE%E0%A5%8D%E0%A4%B9%E0%A4%A3%E0%A4%BE%E0%A4%AF%E0%A4%9A%E0%A5%87-%E0%A4%86%E0%A4%B9
Instagram