• BLOG,  Social Corner

  मदत शहीद झाल्यानंतरच का ?

  "भारतमातेच्या रक्षणा,ते स्वतःसाठी जगणं विसरले, कुटुंबावरही पाणी सोडले ! सीमेवर गोठवणाऱ्या थंडीत,रात्ररात्र जागून पहारे दिले !आम्ही गरम जेवणाचे चोचले केले, त्यांनी मात्र मिळेल ते खाल्ले !आम्ही जल्लोषात सण साजरे केले,ते मात्र आमच्या आनंदानेच खूष झाले ! आम्ही कुटुंबासोबत एकत्र वेळ घालवला ,त्यांनी फोटो पाहूनच समाधानाचा ढेकर दिला ! ते कर्तव्य पार पाडताना शहीद झाले, बातमी ऐकून आमच्या काळजात धस्स झाले ! यावेळी त्यांच्या चेहऱ्यावर स्मितहास्य होते,पण आमचे डोळे मात्र पाणावलेले होते !जीवाची बाजी लावताना ते खूष होते, कारण ते भारतमातेचे वीरपुत्र होते.... वीरपुत्र होते !  पुलवामा आतंकी हल्ल्याची बातमी ऐकली अन् प्रेमाच्या गुलाबी रंगात सजलेला देश क्षणार्धात दुःखाच्या सागरात बुडाला. समग्र देशवासियांच्या डोळ्यांत अश्रू होते. हल्लेखोर ‘आतंकीस्तान’वर टीकांचा पाऊस पडला. देशभरातून शहीदांच्या कुटुंबियांना आर्थिक मदत जाहीर झाली. त्यांच्यासाठी जातपात,…

 • India,  More to Explore

  ज्वालादेवी मंदिर : एक शक्तिपीठ

  ज्वालादेवी मंदिर म्हणजे माता सतीच्या ५१ शक्तिपीठांपैकी एक. हिंदू देवता ज्वालामाईला समर्पित हे मंदिर आदिकाळापासून अस्तित्वात असल्याचा उल्लेख महाभारतातही आढळतो. या मंदिराचे वैशिष्ट्य म्हणजे इथे इतर मंदिरांमध्ये असते तशी देवीची मूर्ती नाही. इथे आहे ती अखंड ज्वाला, जी कधीही विझत नाही. लोक तिचीच पूजा करतात. जसे त्रियुगीनारायण मंदिर तिथे असणाऱ्या अखंड धुनीसाठी भाविकांमध्ये प्रसिद्ध आहे, तसेच ज्वालादेवी मंदिर इथे अखंड तेवत असणाऱ्या ज्वालेसाठी !  आश्यर्याची बाब म्हणजे अनेक शोधमोहिमा राबवूनही शास्त्रज्ञांना  या अखंड ज्योतीचं रहस्य कळलेलं नाही. त्यांच्या मते ,ज्वालादेवी मंदिराच्या खाली खोलवर निद्रिस्त ज्वालामुखी आहे. तिथून येणाऱ्या नैसर्गिक वायुमूळे ही ज्वाला कधीही विझत नाही आणि तिलाच इथले लोक दैवी चमत्कार मानतात. म्हणूनच ७०च्या दशकात भारत शासनाने इथला नैसर्गिक वायूचा…

 • More to Explore,  शोध अज्ञाताचा.....

  जीविताचा दगड बनवणारं सरोवर : लेक नॅट्रॉन (Lake Natron)

  मंडळी, आपण दगडाचा बगीचा पाहिला. त्यामध्ये ध्यानचंद नावाच्या अवलियाने स्वतःच्या हातांनी दगडाच्या मूर्त्या घडवल्या. पण तुम्ही कधी जिवंत प्राण्याचे पाषाणात रूपांतर झाल्याचे पाहिले का ? पुराणकाळात केवळ ऋषीमुनींच्या शापानेच हे घडत असे, पण आता ही किमया निसर्गानेच केली आहे. आफ्रिकेत उत्तर टांझानियामधलं लेक नॅट्रॉन हे त्याचे ज्वलंत उदाहरण ! इथे जगप्रसिद्ध छायाचित्रकार निक ब्रँड्ट यांनी काढलेले फोटो सोशल मीडियावर टाकले व त्यानंतर निसर्गाचा हा चमत्कार जगासमोर आला. त्यांनी पाहिले की सरोवराच्या किनाऱ्यावर पशुपक्ष्यांचे पुतळे आहेत. खरं तर ते पुतळे नव्हते, होते पशुपक्ष्यांचे दगडासारखे टणक बनलेले मृतदेह. ते सरोवराच्या पाण्यामुळेच असे झाले होते. हेच तर आहे लेक नॅट्रॉन चं वैशिष्ट्य !  जो त्यात जातो, त्याचं थोड्याच वेळात चुनामयन (calcification) होऊन दगडात रूपांतर होतं…

 • BLOG,  Social Corner

  बटाटा,अंड की कॉफी बिन्स..?

  प्रत्येकाच्या आयुष्यात चढउतार हे येतच असतात. आपण त्या घटनेकडे कसे पाहतो यावर पुढच्या गोष्टी ठरतात. अनेकदा संकटं आली की आपण हतबल होतो आणि सरळ देवावर सगळं लादून मोकळे होतो. त्यातूनही काही नाही झालं की नशिबाला दोष देत आयुष्यभर रडत बसतो. अशीच एक रडुबाई होती नयना. मितभाषी, शातं पण लहानसहान गोष्टींचा अतिविचार करणारी. एकेदिवशी कामावरून घरी आली तीच मुसमुसत आईच्या कुशीत शिरली. आईने विचारलं, “नयना,काय झालं ? आल्याआल्याच रडायला लागलीस.” नयना वैतागलेल्या स्वरात आईला म्हणाली, “मी कुणाचं काय वाईट केलंय की माझ्यामागे संकटांचा ससेमिरा लागलायं. एक संपलं की दुसरं समोर असतंच. आई मी थकलेय आता या आयुष्यालाच कंटाळलेय. नको वाटतं आता सगळं”. आईने तिला घट्ट मिठी मारली आणि म्हणाली, “नयना,आज काय…

 • BLOG,  India,  More to Explore

  त्रियुगीनारायण : जिथे शिवपार्वती विवाहबंधनात अडकले!

  असं म्हणतात, ‘लग्नगाठ स्वर्गात बांधली जाते, कारण ती पवित्र असते’. म्हणूनच तर विवाहसोहळ्याला खूप महत्त्व आहे, कारण आपण भावनिकदृष्टया त्याच्याशी जोडलेले असतो. त्यामुळे विवाह कुठे करायचा याचाही अगदी कल्पकतेने विचार केला जातो. त्यातूनच उदयाला आलेली कल्पना – डेस्टिनेशन वेडिंग ! अगदी राजसी थाटातील राजमहालांपासून दऱ्याखोऱ्यांतील पर्वतांवर लग्न केली जातात. असंच लग्नासाठी एक हटके डेस्टिनेशन म्हणजे उत्तराखंडमधील त्रियुगीनारायण मंदिर ! ते मंदिर जिथे भगवान शंकर व माता पार्वती यांचा विवाहसोहळा पार पडला.  हा विवाहसोहळा आपल्याला थेट शिवपार्वतीच्या काळात घेऊन जातो. माता पार्वती ही शिवभक्त होती. तिने भगवान शंकराला मिळवण्यासाठी ‘गौरीकुंड’ येथे अखंड तपस्या केली. भगवान शंकर प्रसन्न झाले. त्यांनी गुप्तकाशीमध्ये माता पार्वतीला लग्नाची मागणी घातली. त्यानंतर त्रियुगीनारायण येथे त्यांचा विवाहसोहळा संपन्न झाला. पुराणानुसार त्रियुगीनारायण ही…

 • More to Explore

  मोराची चिंचोली : एक अविस्मरणीय अनुभव !

  "नाच रे मोरा ,आंब्याच्या वनात  नाच रे मोरा नाच ढगांशी वारा झुंजला रे,काळा काळा कापूस पिंजला रेआता तुझी पाळी ,वीज देते टाळीफुलव पिसारा नाच,नाच रे मोरा......" बघा! वाचताना नकळत तुम्हीही लयबद्ध आवाजात बोललात. हे बालगीतच तसं आहे. ते ऐकलं किंवा वाचलं तरी आपण भूतकाळात जातो आणि बालपणीच्या गोड आठवणी ताज्या होतात. तेव्हा शाळेत आपण मोठ्या उत्साहाने कोरसमध्ये हे गीत म्हणायचो, पण तुम्ही कधी असा नाचणारा  मोर पाहिलात का? आंब्याचं वन तर आपल्यापैकी बहुतांश जणांनी पाहिलंय. पण, पावसाची चाहूल लागताच आनंदाने नाचणारा मोर पाहणारा खरंच भाग्यवान! अशा भाग्यवानांच्या यादीत तुम्हांलाही  यायची इच्छा आहे का ? जर उत्तर ‘हो’ असेल तर ‘मोराची चिंचोली’ तुमची वाट बघतेय. मोराची चिंचोली. नाव थोडं वेगळं आणि आकर्षक आहे ना…

 • India,  More to Explore,  शोध अज्ञाताचा.....

  रांजण खळगे : कधीही न आटणारे !

  ‘रांजण’ हा शब्द वाचून तुम्हाला काही आठवलं का ? मला तर तहानलेल्या कावळ्याची गोष्ट आठवली. त्याने नाही का, रांजणात लहान – लहान दगड टाकले. त्यामुळे पाण्याची पातळी वाढली. मग तो ते पाणी प्यायला आणि स्वतःची तहान भागवली. अशीच काही रांजणं आहेत महाराष्ट्रातल्या पुणे जिल्ह्यातील शिरूर व अहमदनगर जिल्ह्यातील पारनेर तालुक्याच्या सीमेवर असलेल्या कुकडी नदीमध्ये. पण, ही रांजणं कोणी मनुष्याने बनवली नाहीत, ती आपोआप तयार झाली आहेत. एवढंच नाही तर, “आशिया खंडातील महाकाय जलकुंड” म्हणून त्यांची गिनिज बुकमध्ये नोंदही झाली आहे. त्यांनाच रांजण खळगे म्हणतात. या जलकुंडांचं आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे ती बारमाही आहेत. दुष्काळ पडला तरी आटत नाहीत ! विज्ञान सांगतं, ही नद्यांची भौगोलिक विशेषता आहे. त्या पाण्यासोबत लहानमोठे दगडगोटे वाहून…

 • More to Explore,  शोध अज्ञाताचा.....

  ९० अंशातलं वक्र अरण्य !(crooked forest)

  जगात अशी अनेक आश्चर्य आहेत ज्यांची उत्तरं विज्ञानालाही अजून सापडली नाहीत. आता या वक्र अरण्याचंच बघा ना ! इथे ९० अंशात वाकलेली व उंच वाढलेली देवदार वृक्षांची जवळजवळ ४०० झाडं आहेत. त्यांचं वैशिष्ट्य हे की ही सर्व झाडं एकाच दिशेने वक्र झालेली आहेत.सलग २२ रांगांमध्ये उत्तरपूर्व दिशेने वाढलेली ही झाडं बुंध्याजवळ ३ ते ९ मीटरमध्येच बरोबर वक्र झाली आहेत. पाहताक्षणी वाटावं आरामदायी खुर्चीच जणू ! वक्र अरण्याचं हे रहस्य आपल्याला ८९ वर्ष मागे घेऊन जातं. असं म्हणतात, १९३० साली काही शेतकऱ्यांनी या जागी देवदार वृक्षांची रोपं लावली. ती सात वर्षांची झाल्यावर त्यांनी वेगळं फर्निचर बनवण्याच्या दृष्टीने या झाडांचा बुंधा असा वक्राकार केला. पण नेमका त्याच वेळी पोलंडने दुसऱ्या महायुद्धात प्रवेश केला.…

 • Social Corner

  तुम्ही कोण आहात …. सामान्य की असामान्य ?

  नमस्कार मंडळी ! आज तुमच्या भेटीला आलेय पण कोणताही निसर्गाचा चमत्कार किंवा पर्यटनासंबंधीचा लेख न घेता ! म्हटलं, दररोज आपण पर्यटनाविषयी बोलतो. आज स्वप्नांवर बोलू काही ! आपल्या ब्लॉगच्या नावातही आहेच की स्वप्न (Dream). खरचं, या शब्दातच फँटसी आहे . नाव उच्चारताच वाचणारा प्रत्येकजण ‘ माझं स्वप्न काय?’ हा विचार करू लागला. तशी ही स्वप्न व्यक्ती, प्रसंग व परिस्थितीनुरूप प्रत्येकासाठी वेगवेगळी असतात. बऱ्याचदा स्वप्न पूर्ण झालं म्हणून एखादा आनंदाने हरखून जातो, तर स्वप्न हे स्वप्नच राहिलं म्हणून एखादा नशिबाला दोष देत बसतो. पण या दोन्ही परिस्थितींमधल्या संधीचं गमक जो ओळखतो तोच खरा विजेता ठरतो. असाच एक विजेता म्हणजे कॅरोली टाकाक्स (Karoly Takacs). आज आपण त्याची जीवनकथा पाहूया.  बुडापेस्टमधल्या एका सामान्य मध्यमवर्गीय कुटुंबात जन्माला…

 • Bolivia tourism
  More to Explore,  शोध अज्ञाताचा.....

  एक महाकाय आरसा : सालार दे उयुनी

  ”मीच माझ्या रूपाची राणी गं, मी कशाला आरशात पाहू गं”, हे गाणं ऐकलंत का हो ? मला तर वाटतं हे गाणं लिहिणाराही तयार होताना दहा वेळा आरशात बघत असेल. आपण तरुण-तरुणी तर इतका वेळ त्या आरशात पाहून आवरत असतो कि आईला शेवटी म्हणावं लागतं, “अगं बास आता ! तो आरसा लाजेल.” इतकं अनन्यसाधारण महत्त्व आहे या आरशाला ! तुम्हीही जर थोड्या थोड्या वेळाने स्वतःला आरशात पाहत असाल तर हा लेख तुमच्यासाठीच आहे. आज आपण अशा ठिकाणी जाणार आहोत जिथे जगातील सगळ्यात मोठा आरसा आहे. त्याची निर्मिती खुद्द निसर्गदेवतेनंच केली आहे. हा आरसा आहे अँडीज पर्वतरांगांजवळ वसलेल्या बोलिव्हियामध्ये. दक्षिण- पश्चिम बोलिव्हियाच्या पोटोसीमध्ये डॅनियल कॅम्पोस प्रांतात हा विशाल आरसा आहे. त्याचंच नाव सालार…

RSS
EMAIL
Facebook
Facebook
Google+
Google+
http://travelwithdreams.com
Instagram